सिन्नर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिन्नर या बँकेतील कर्मचारी यांची मनमानी

सिन्नर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिन्नर या बँकेतील कर्मचारी यांची मनमानी
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर प्रतिनिधी : सिन्नर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिन्नर या बँकेतील कर्मचारी यांची मनमानी काही संपयाची नाव घेत नाही. दैनिक महासागर मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे प्रसाशकीय यंत्रणा जागी झाली असली तरी किती दिवस कार्यक्षम कारभार चालेल याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
सभासद व ठेवीदारांना येथील कर्मचारी व शाखा व्यवस्थापक जयश्री सोनवणे यांचे कडून नेहमी समजोता व उत्तम कामगिरी देण्यासाठी प्रयत्न असतो. कालच्या बातमीत गैरसमजातुन त्यांचे नाव आले होते. परंतु काही गोष्टी त्यांच्या पर्यंत गेल्या नसून, इतर कर्मचारी यांच्या कडून हेतू पुरस्कर त्रास दिला जातो. आणि व्यवस्थापक म्हणून सोनवणे मॅडम यांना टार्गेट केले गेले. तरी त्यांच्या कडून सर्व सभासद आणि ग्राहक यांना त्या नेहमी मदत करत असतात व यापुढेही त्या मदत करतील असे आश्वासन त्यांनी दिले.
सिन्नर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवेदारांकडून ठेवीची मुदत संपल्यानंतर सदर ठेव पावती ही नूतनिकरण करण्याची पद्धत सर्वच बँका व सहकारी पतसंस्था करत असतात.
कोणतीही ठेव नूतनिकरण करणे ही त्या बँकेतील कर्मचारी यांची असते. त्यासाठी व्यवस्थापक यांच्या पर्यंत जाण्याची गरज नसते. परंतु कर्मचारी यांच्या गलथान पणामुळे जिल्हा बँकेची बदनामी होत असते. सभासदांना त्याचा किती त्रास होतो याचा विचार करणे गरजेचे आहे.