ताज्या घडामोडी
पतसंस्थेच्या कर्जबुडव्यांनचा सातबारा होणार पतसंस्थेच्या नावावर – उच्च न्यायालयाचे आदेश

पतसंस्थेच्या कर्जबुडव्यांनचा सातबारा होणार पतसंस्थेच्या नावावर – उच्च न्यायालयाचे आदेश
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
- गेवराई येथील जयप्रकाश पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांकडे वारंवार मागणी करूनही कर्जाचा भरणा न केल्याने पतसंस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार यांना आदेश देऊन थकीत कर्जदाराच्या ७/१२ उतारावर जयप्रकाश पतसंस्थेचे नाव मालकी हक्कात लावून ताबा देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पतसंस्थेच्या कर्जवसुलीतील अडथळे दूर झाले असून, कर्ज बुडवू इच्छिणाऱ्या कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.
दै. लोकमत यांच्या सौजन्याने
- तालुक्यातील कर्जदारांच्या व जामीनदारांच्या मालमत्तेसंबंधी पतसंस्थेस म. स. सं.अ. १९६० चे कलम १०० नियम ८५ अंतर्गत रीतसर कार्यवाही करता येते. जिल्हा उपनिबंधकांकडून आदेश प्राप्त करून . या प्रकरणी थकीत कर्जदारांच्या व जामीनदारांच्या स्थावर मालमत्ता पतसंस्थेच्या नावे करून व संस्थेला मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा देण्याबाबत व कर्जदाराच्या सर्वाधिकार करण्याबाबत मालमत्तेसंबंधी संस्थेच्या स्वाधीन कारवाईसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी गेवराईच्या तहसीलदारांना प्राधिकृत केले होते. परंतु या प्रकरणी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्यामुळे जयप्रकाश पतसंस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.