ताज्या घडामोडी

सिन्नर नगरपालिकेत युवक नेतृत्वाची धडाकेबाज एंट्री

सिन्नर नगरपालिकेत युवक नेतृत्वाची धडाकेबाज एंट्री

बुबुश देशमुख उपनगराध्यक्ष; गवळी–वरंदळ स्वीकृत नगरसेवक

गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | प्रतिनिधी, दि. १४ जानेवारी २०२६

सिन्नर नगरपालिकेत नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला असून, सामाजिक कार्यातून उभे राहिलेले युवक नेतृत्व बुबुश (हर्षद) देशमुख यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीने राजकीय वर्तुळात हालचाल निर्माण झाली आहे. त्याचवेळी, निष्ठावंत संघटनात्मक कार्यकर्ते सुनील गवळी व विजय वरंदळ यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड होताच, कार्याला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाचा स्पष्ट संदेश शहरात गेला आहे.

          सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बुबुश (हर्षद) देशमुख यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या सामाजिक कार्याची, जनहितासाठीच्या सातत्यपूर्ण भूमिकेची आणि लोकविश्वासाची ही ठळक पोचपावती मानली जात आहे. युवक नेतृत्वाला मिळालेली ही महत्त्वाची जबाबदारी सिन्नरच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगरसेवक म्हणून कार्यरत असताना केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून बुबुश देशमुख यांची ओळख आहे. पाणीटंचाई, नागरी समस्या, आरोग्यविषयक प्रश्न तसेच आपत्तीच्या काळात त्यांनी पुढाकार घेत नागरिकांसाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयात प्रत्यक्ष उपस्थित राहत रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना दिलेली मदत आजही सिन्नरकरांच्या स्मरणात आहे.

       दरम्यान, सिन्नर नगरपालिकेतच सुनील गवळी व विजय वरंदळ यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी सातत्याने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलेल्या संघटनात्मक व जनसंपर्कातील कार्याची ही पोचपावती असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

    कोणतेही पद नसतानाही पक्षसंघटन, निवडणूक कामकाज आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नगरपालिकेच्या कामकाजात ते सकारात्मक व लोकाभिमुख योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे उपनगराध्यक्षपदी सक्रिय युवक नेतृत्वाची निवड, तर दुसरीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी—या दोन्ही घडामोडींमुळे सिन्नर नगरपालिकेच्या आगामी कार्यकाळाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Chief Editor

www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. gurunewssinnar@gmail.com - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी Digital Media Ethics Code भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. (तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये