सिन्नरचे नविन सहाय्यक निबंधक म्हणून संजय गिते यांनी पदभार स्विकारला.

सिन्नरचे नविन सहाय्यक निबंधक म्हणून संजय गिते यांनी पदभार स्विकारला.
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क :
सिन्नर तालुक्यातील सहकारी पतसंस्था कार्यक्षम असून, त्या अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नव्याने रुजू झालेले सहाय्यक निबंधक मा. श्री. संजय गिते यांनी दिले आहेत.
सिन्नर येथील सहाय्यक निबंधक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सिन्नर मधील व्यवस्थापक यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी श्रीमंत पतसंस्थेचे कार्यकारी संचालक महेश कुटे, लोकनेते पतसंस्थेचे व्यवस्थापक मधुकर कोकाटे, कस्तुरी पतसंस्थेचे व्यवस्थापक निमिष लाले, माऊली पतसंस्थेचे व्यवस्थापक मधुकर खरात, श्रीलेखा पतसंस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी, जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर, विशेष वसुली अधिकारी राजाराम उगले यांनी सन्माननीय गीते साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गेल्या पाच-सहा महिण्यापासून सिन्नर तालुक्याला पूर्णवेळ सहाय्यक निबंधक नसल्याने सहकारी संस्थाचे बरेच कामे मंदावले होते. मध्यतरीच्या काळात अधिक पदभार स्विकारून मा.श्री. राजेन्द्र इप्पर साहेब यानी बऱ्यापैकी कामाना चालना दिली होती. यापुढे सहकारी पतसंस्थाच्या कोणत्याही अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकारी पतसंस्थांचे व्यवस्थापक यांनी शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता सहाय्यक निबंधक कार्यालयात हजर राहण्याची सुचना देण्यात आली आहे. तरी व्यवस्थापक यांनी वेळेवर हजर राहण्याची सवय ठेवावी असे आवाहन पतसंस्था पदाधिकारी यांनी केलेले आहे.