कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नरच्या वावी उपबाजारात पशू–पक्षी प्रदर्शनाचा उत्साहात समारोप

कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नरच्या वावी उपबाजारात पशू–पक्षी प्रदर्शनाचा उत्साहात समारोप
१४ गटांत ५६ जनावरांना बक्षिसे; सुमारे ६ लाखांचे बक्षीस वितरण
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर | दि. ५ जानेवारी २०२६, www.gurunews.co.in
कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर यांच्या वतीने उपबाजार वावी येथे आयोजित पशू–पक्षी प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. हा समारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली तर मा. खा. राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला.

यावेळी बोलताना मा. खा. राजाभाऊ वाजे यांनी बाजार समितीच्या दरवर्षी वाढणाऱ्या उत्पन्नातून अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी सूचना केली. तर मा. खा. राजू शेट्टी यांनी, भविष्यात खाजगी बाजार समित्यांशी होणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बाजार समितीने नावीन्यपूर्ण व शेतकरीपूरक उपक्रम सातत्याने राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

बक्षीस वितरणासाठी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती, कोपरगावचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती रेवन्नाथ निकम, संचालक बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, उपस्थित होते. याशिवाय कोपरगाव उद्योग समूहातील अशोक औताडे, शंकरराव औताडे, आण्णासाहेब चौधरी, अरुण घुमरे, नारायण चिने आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास भारतशेठ कोकाटे, विठ्ठल राजेभोसले, विजय काटे, हौशिराम घोटेकर, पंढरीनाथ ढोकणे, कैलास वाजे, तुषार मोजाड, सोपान दिवटे, प्रकाश पांगारकर, निलेश केदार, अजित देसाई, रविंद्र पवार, गणेश वेलजाळी, दीपक वेलजाळी, निवृत्ती अरिंगळे, संतोष भोपी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरचे सभापती श्रीकृष्ण घुमरे, उपसभापती सिंधुताई कोकाटे, रविंद्र शेळके, जालिंदर थोरात, नवनाथ नेहे, अनिल शेळके व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर संजयजी गीते, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, सहआयुक्त पशुसंवर्धन सिन्नर संजय थोरात यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. तसेच सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी या कार्यक्रमासाठी आपले बहुमोल योगदान दिले.
या प्रदर्शनासाठी एकूण ५६ जातीवंत जनावरांची निवड करण्यात आली. दुधाळ गाय IHF कॉमन गटात श्री. सुरज शिंदे यांच्या गायीने एकावेळी ४२ लिटर दूध देत प्रथम क्रमांक पटकावला. या गटासाठी संजीवनी सहकारी साखर कारखाना, कोपरगाव यांच्या वतीने ₹५१,०००/- चे प्रथम पारितोषिक देण्यात आले. तसेच द्वितीय व तृतीय बक्षिसांसाठी गोदरेज अॅग्रोवेट कंपनीचे किरण शिनलकर, प्रदीप बोराडे तसेच डायनॅमिक डेअरी, बारामतीचे मनीष ताडपत्रीकर यांनी आर्थिक सहकार्य केले.
एकूण १४ गटांत सुमारे ₹६ लाखांची ५६ बक्षिसे वितरित करण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. जनावरांची पात्रतेनुसार निवड करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सिन्नरचे डॉ. संजय थोरात, सचिन शेळके, अजय थोरात, दत्ता पोटेगावकर, दीपक शेंगार, योगेश दुबे व निकीता गवळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. हे पशू–पक्षी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित गोपालकांनी व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सदर प्रदर्शनासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, सहकार व पणन विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.



