ताज्या घडामोडी

सिन्नरजवळील इंग्रजी शाळेत गंभीर आरोपांचा भडका; विद्यार्थिनीची तक्रार,

सिन्नरजवळील इंग्रजी शाळेत गंभीर आरोपांचा भडका;
विद्यार्थिनीची तक्रार,

पालक-पत्रकारांशी धक्काबुक्कीचा आरोप

गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | प्रतिनिधी, दि. २० जानेवारी २०२६, www.gurunews.co.in

नाशिक–पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाट्याजवळ असलेल्या चार मजली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका मुलीने शाळेतील केरळहून आलेल्या शिक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.

या तक्रारीबाबत जाब विचारण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकांसोबत केरळच्या मॅनेजमेंटने धक्काबुक्की व मारामारी केल्याचा आरोप असून, तक्रारकर्त्या मुलीच्या आईला देखील मारहाण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच चित्रीकरणासाठी दाखल झालेल्या मीडिया टीमसोबतही शाळा व्यवस्थापनाची बाचाबाची झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
     पत्रकार जाब विचारत असताना व्यवस्थापनाकडून मोबाईल कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, काही महिलांकडून पत्रकारांवर मोबाईल कॅमेरे रोखून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पुढे आला आहे.
      हे संपूर्ण प्रकरण सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी तक्रारींची गंभीर दखल घेत चौकशी करून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या इंग्रजी माध्यमाच्या परकीय व्यवस्थापनाच्या शाळेत स्थानिक नोकरदारांचीही अडचण झाल्याचे चित्र आहे.
      या घटनेची माहिती बजरंग दलाकडूनही घेतली जात असून, विविध स्तरांतून प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Chief Editor

www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. gurunewssinnar@gmail.com - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी Digital Media Ethics Code भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. (तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये