मा. दिनेश खेडलेकर यांचे अभिष्टचिंतन!

मा. दिनेश खेडलेकर यांचे अभिष्टचिंतन!
गुरू न्यूज नेटवर्क, सिन्नर | दि. २६ नोव्हेंबर २०२५ www.gurunews.co.in
न्यू गुरुकृपा स्पेअर पार्ट व गुरुकृपा ट्रान्सपोर्ट चे संचालक सन्माननीय दिनेश खेडलेकर यांचे अभिष्टचिंतन सोहळा हेल्थ इज वेल्थ ग्रुप तर्फे आज साजरा करण्यात आला. या ग्रुपचे वैशिष्ट्ये म्हणजे सर्व मित्रपरिवार व्यापारी वर्ग आहेत. माननीय खेडलेकर यांना व्यापार क्षेत्रात तब्बल 32 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार व्यवसायामध्ये प्रगतीपथावर असून, या सर्व मित्र परिवाराकडून यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा गोंदेश्वर मंदिर येथे साजरा करण्यात आला.

आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक आयुष्य तिन्ही गोष्टी नीट आणि संतुलित राहणे. फक्त आजार नसणे म्हणजे आरोग्य नाही; तर ऊर्जा, आनंद, शांतता आणि चांगली जीवनशैली असणे म्हणजे आरोग्य होय.
Health is Wealth ग्रुप म्हणजे हे प्रामुख्याने आरोग्यविषयक चर्चा, माहिती व प्रेरणासाठी तयार केलेले ग्रुप असून, यात सदस्यांना फिटनेस, योगा, डाएट, मानसिक आरोग्य, वजन नियंत्रण, हेल्दी लाइफस्टाइल याबाबत मार्गदर्शन असते.
ग्रुपचे उद्दिष्ट
आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, हेल्दी लाइफस्टाइल पाळण्यासाठी प्रोत्साहन देणे, डाएट, व्यायाम, योगा याबद्दल मार्गदर्शन करणे. त्याच बरोबर आजारांचे प्रतिबंधक उपाय सांगणे. सदस्यमधील प्रेरणा व प्रगती शेअर करणे. रोजच्या व्यायामाचे प्लॅन्स व नियोजन केले जाते. अशा या ग्रुप मधील सदस्य माननीय दिनेश खेडलेकर यांच्या या वाढदिवसाच्या औचित्य साधून सर्व मित्र परिवार यांनी मोठ्या थाटामाटात आपल्या मित्राचे अभिष्टचिंतन केले असून, त्यांना यापुढील भावी वाटचालीस आरोग्य, सुख, समृद्धी लाभो हीच या ग्रुप कडून त्यांना शुभेच्छा !



