“जीवनगौरव पुरस्कार” 2025 पंढरपूर येथे संपन्न

“जीवनगौरव पुरस्कार” 2025 पंढरपूर येथे संपन्न
गुरु न्यूज नेटवर्क, सिन्नर, दि. 11
www.gurunews.co.in
अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन 2025 दि. 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
पंढरपूर येथील उद्घाटन कार्यक्रमात के. जे. मेहता व ई. वाय. फडोळ जुनिअर कॉलेज, नाशिक रोडचे सेवानिवृत्त उपप्राचार्य व कलाशिक्षक श्री. हेमंत रामदास देवनपल्ली यांना संघटनेच्या वतीने “जीवनगौरव पुरस्कार” 2025 देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत (मा. सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य ) मा. नागेश वाघमोडे साहेब (परीक्षा नियंत्रक महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई) यांच्या शुभहस्ते व मा. एस. डी. भिरूड, (सरचिटणीस जळगाव) व मा. शेरशहा डोंगरी (अध्यक्ष सोलापूर) या मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यामुळे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रवीणजी जोशी यांनी देवनपल्ली सरांचे अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सिन्नर येथील मा. हेमंत नाना वाजे, मनीष गुजराती, ताराचंद खिंवसरा, शामराव देशमुख, गोपी शिंदे, अनुप गुजराती, सुरेश गुजराती, अशा अनेक मान्यवरांनी देवानपल्ली सरांचे अभिनंदन करून कलेच्या क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिल्याबद्दल त्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.