पत्रकार दिनानिमित्त गिते व निरगुडे यांचा आमदार सत्यजित तांबे यांचे हस्ते सत्कार!

पत्रकार दिनानिमित्त गिते व निरगुडे यांचा आमदार सत्यजित तांबे यांचे हस्ते सत्कार!
गुरु न्यूज नेटवर्क, सिन्नर, : www.gurunews.co.in
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते तसेच अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कै. कृष्णराव पाटील कोठावळे गुणवंत पत्रकार पुरस्काराने जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना गौरवण्यात आले तसेच सिन्नर तालुक्यातील सकाळ चे बातमीदार विकास गिते तसेच दिव्य मराठीचे अमोल निरगुडे यांनाही गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सुभाष गायकवाड,सुभाष तळाजिया, डॉ. प्रतापराव कोठावळे, किशोर कोठावळे आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, भरत पाटील,विशाल पवार, श्री कालिका देवी मंदीर संस्थान, नाशिक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मनिषा पाटील या उपस्थित होत्या.
श्री कालिका देवी मंदिर संस्थान, नाशिक आयोजित पत्रकार दिना निमित्ताने कै. कृष्णराव पाटील कोठावळे पत्रकार सत्कार सोहळा श्री कालीका मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता.
यात जिल्ह्यातील अनेक विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सिन्नर तालुक्यातील पत्रकार अमोल निरगुडे व विकास गिते यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे तसेच कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान देवून गौरवण्यात आले आहे. यावेळी” नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार दिनाचे औचित साधत पत्रकारांनी केलेल्या कामाची स्तुती करत. ते एक समाजाचा चौथा स्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित करत सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला.
श्री कालिका देवी मंदीर संस्थान, नाशिकचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे सुभाष तळाजिया, डॉ. प्रतापराव कोठावळे, किशोर कोठावळे आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार उपस्थित होते.
फोटो _श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त सिन्नर तालुक्यातील पत्रकार अमोल निरगुडे वविकास गिते यांना पारितोषिक व प्रशस्तीपत्र आमदार सत्यजित तांबे, अण्णासाहेब पाटील, संस्थेचे पदाधिकारी अधिकारी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले .