जीवन सुंदर असून, आनंदाने जगा – मा. गणेश शिंदे

जीवन सुंदर असून, आनंदाने जगा – मा. गणेश शिंदे
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क, www.gurunews.co.in :-
सुखी जीवनाचे रहस्य विशद करताना संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या व काही अभंगाचे दाखले देत सर्व सामान्यांच्या हृदयाला स्पर्श केला. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे दाखले देत प्रत्येकाच्या मनात प्रेरणा जागृत केली. मानवाला भूतकाळ जगता येत नाही. भविष्य ही जगता येत नाही. म्हणून जे जीवन जगायचे असेल ते फक्त वर्तमानात सुखाने जगावे. यासाठी आजचे व्याख्यान नेहमीच प्रेरणा दायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही. असे मत मा. श्री. गणेश आत्माराम शिंदे यांनी व्यक्त केले.
जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना सर्व जन सुख शोधण्यासाठी थंडपड करत असतात. श्रीमंतापासून गरीबापर्यंत सुख शोधण्याची धडपड सुरु असते. पण ते सुख छोट्या- छोट्या गोष्टीतून आणि आपल्या कुटुंबातील संवाद व सहवास यात खऱ्या अर्थाने दडलेले असते. असे माहेश्वरी समाज संघटनेने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात जीवन सुंदर आहे या कार्यक्रमाचे व्याख्याते मा. श्री. गणेश शिन्दे यांनी आपल्या व्याख्यातातून संभोतीत केले.
मा. श्री. शिन्दे पुढे म्हणाले की, जीवणात आईच्या स्पर्शातील सहवास आणि वडीलांचा संवादातील आधार मनुष्याला जीवणात नेहमी पुढे घेवून जाईल व सुखाचा मार्ग दाखविल्या शिवाय राहणार नाही. असा या भाषणातून त्यांनी उपस्थिताना सांगण्याचा मा.श्री. शिन्दे यांच्या १ तास ४५ मिनिटे चाललेल्या संवादातून एक-एक प्रसंग इतका बोलका होता की, एकही मिनिट कंटाळवाना नव्हता, आणि हे व्याख्यान संपू नये असे सर्वांना वाटत होते.
प्रत्येकांच्या जीवणात सुख-दुख असतात पण ते सहजरित्या जीवनात विसरून छोट्या – छोट्या गोष्टीतून आनंद मिळवत सुख उपभोगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे मत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर, सिन्नर नगरपालिका समोर, हुतात्मा चौक, सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. सदर कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटत दाद दिल्याबद्दल आयोजकांनी उपस्तितांचे आभार मानले.