सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी संग्राम कातकाडे, तर उपाध्यक्षपदी अरुण वारुंगसे यांची बिनविरोध निवड

सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी संग्राम कातकाडे, तर उपाध्यक्षपदी अरुण वारुंगसे यांची बिनविरोध निवड
सिन्नर | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मा. संग्राम शिवाजीराव कातकाडे, तर उपाध्यक्षपदी मा. अरुण नामदेव वारुंगसे यांची बिनविरोध निवड झाली असून, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या १३ संचालकांची सोमवारी दिनांक ९ जून रोजी सहाय्यक निबंधक मा. संजय गीते यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यलयात सभा घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष पदासाठी मा. संग्राम शिवाजीराव कातकाडे व उपाध्यक्ष पदासाठी मा. अरुण नामदेव वारुंगसे यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने यांची निवड बिनविरोध झाल्याचे सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी घोषित केले.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संग्राम कातकाडे यांनी फेडरेशनचे उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष देण्यासोबतच सभासद वाढीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणि फेडरेशन उपाध्यक्ष अरुण वारुंगसे यांनी आपल्या भाषनात सहकाराला बळकटीकरण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, तर सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते यांनी नूतन कार्यकारणीला वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह फेडरेशनचे उत्पन्न वाढविण्याबाबत प्राधान्याने विचार करण्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, गोदा युनियन सहकारी संस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव सांगळे, राजेंद्र अंकार, मच्छिद्र चिने, अनिल पवार, भाऊसाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी फेडरेशनचे सर्वश्री संचालक बाळासाहेब आव्हाड, कांताराम माळी, ईलाईबक्ष शेख, कैलास पवार, तेजश्री वाजे, सुमन बोडके, छाया घोलप उपस्थित होते. सहकार अधिकारी नवनाथ गडाख यांनी सहाय्य केले. तसेच कातकडे यांचे मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्याप्रमानात उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांताराम माळी यांनी केले.