विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब देशपांडे

विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा अध्यक्षपदी बाळासाहेब देशपांडे
सिन्नर प्रतिनिधी, गुरू न्यूज नेटवर्क :
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची नाशिक ग्रामीण जिल्ह्याची व्यापक बैठक झाली. या व्यापक बैठकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील एकूण १० प्रखंडापैकी ७ प्रखंडातील ५० सदस्य संख्या उपस्थित होती. या जिल्हास्तरीय बैठकीत संतोष पांडुरंग केंदळे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सभागृहात हि बैठक पार पडली. बैठकीत प्रांत स्तरावरून नितीन महाजन, बजरंग दल प्रांत सह संयोजक, तसेच, मृणालिनी पडवळ, मातृशक्ती संयोजिका, ह. भ. प. माधवदास महाराज राठी, विभाग मंत्री अनिल चांदवडकर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. तसेच नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा मंत्री देविदास वारुंगसे, सहमंत्री राहुल सोनकुळ, काशिनाथ गावित, अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, उपाध्यक्षा आशा वाणी, उपाध्यक्ष संतोष केंदळे, शहर जिल्हा मंत्री योगेश बहाळकर आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित नाशिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांचे अभिनंदन केले.
विश्व हिंदू परिषद एक विश्वस्तरीय हिंदू संगठना असून, तिची स्थापना १९६४ साली भारतात स्थापन झाली असून, त्या संघटनेच्या जिल्हा स्तरावर शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद अध्यक्षपदी बाळासाहेब ( संजय) देशपांडे निवड झाली असल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विश्व हिंदू परिषद या विश्वस्तरीय संघटनेचा मुख्य उद्देश हिंदू समाज हा समृद्धि, संस्कृत आणि समानता आणणे व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. या संघटनेच्या स्थानिक पातळी सह राष्ट्राांत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शाखा आहेत. या संघटनेमार्फत विभिन्न कार्यक्रम आणि आयोजन करून, हिंदू संघटित करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य या संस्थेमार्फत सुरू आहेत. त्याला अधिक बळकटी देण्याचे कार्य श्री. बाळासाहेब देशपांडे हे विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून पार पाडतील. व तसेच श्री. विलास भगत महाराज यांची विश्व हिंदू परिषद सिन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्याच बरोबर ह.भ.प. श्री देवीदास वारूंगसे महाराज – बजरंग दल नाशिक जिल्हा ग्रामीण मंत्री म्हणून तर श्री. विकी वरंदळ – बजरंग दल नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक, श्री. विनायक जाजू – बजरंग दल सिन्नर तालुका संयोजक, श्री. गौरव लोणारे – बजरंग दल सिन्नर तालुका सहसंयोजक, श्री. ओमकार सोळंकी – बजरंग दल सिन्नर तालुका सहसंयोजक, श्री. भूषण पाटील – बजरंग दल सिन्नर शहर संयोजक, श्री. आकाश लोखंडे – बजरंग दल सिन्नर, आणि सतसंग प्रमुख श्री. निलेश लोणारे, श्री. रोहित वरंदळ, श्री. संजोक नाईक, श्री. यश बलक याची बजरंग दल या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.