देश विघातक घटनांशी संबंधिताना कठोर शिक्षा द्यावी – संजय देशपांडे

देश विघातक घटनांशी संबंधिताना कठोर शिक्षा द्यावी – संजय देशपांडे
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
www.gurunews.co.in
चांदवड टोल नाका येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याने पाकीस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याने खळबळ उडाली आहे. चांदवड येथे सर्वपक्षीयांनी मोर्चा काढुन आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणीही केलेली आहे. पोलिस त्यांचे कर्तव्यही बजावतील यात शंका नाही. असे मत विश्व हिंदु परिषद, नाशिक जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण) श्री. संजय (बाळासाहेब) विनायक देशपांडे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
त्यांनी पुढे असे म्हंटले की, अशा प्रवृत्तींना बळ व चिथावणी कुठुन मिळते हा खरा प्रश्न आहे. या देशद्रोह्यांना हिंमत कोण देते, हा खरा प्रश्न आहे. या समुहामध्ये सोशल मिडीयाचा मोठा हात असुन, अशा प्रवृत्तींचे ते उगमस्थान आहे. यावर सरकारने बारीक लक्ष ठेवले पाहीजे. व यांची पाळेमुळे खणुन काढली पाहिजे. जिल्ह्या जिल्ह्या मध्ये अशांतता पसरवुन दंगली भडकविणे. भविष्यात अशा घटना घडविण्याचा डाव या देशद्रोही संघटनांचा असुन, त्याप्रमाणे संघटन होत असल्याचा संशय देशातील घडलेल्या काही घटनांवरुन दिसुन येतो.
तसेच नाशिक जिल्ह्यात देखील याचे लोन पसरलेले असावे असा संशय आहे. आपल्या भारत देशावर प्रेम करणारे जे मुस्लीम आहेत. त्यांनीच अशा देश द्रोह्यांची माहीती पोलिसांना किंवा देशप्रेमी संघटनांना द्यावी. असे आवाहन विश्व हिंदु परिषद व बजरंग दल यांचे तर्फे करण्यात येत आहे. जेणे करुन अशा प्रवृत्ती पर्यंत लवकर पोहोचता येईल व पुढील अनर्थ टळतील.
अशा देशद्रोह्यांना भारतीय लष्कराच्या स्वाधीन करुन त्यांचेवर लष्करी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. याबाबत भारताचे गृहमंत्री मा. ना. श्री. अमितजी शहा यांना थोड्याच दिवसांत निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक औद्योगीक वसाहती आहेत, टोल नाके आहेत. त्या ठिकाणी अनेक कामगार रोजगारासाठी येतात या सर्वांचे पोलिस व्हेरीफीकेशन ज्या त्या उद्योजकांनी, संस्थांनी घ्यावे. जेणे करुन या सर्वांची संपुर्ण माहीती पोलिसांकडे व कंपनीकडे राहील.
घडलेल्या घटनेचा विश्व हिंदु परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असुन, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व आरोपीस जामीन देखील मिळणार नाही व मृत्युदंडापर्यंत आरोपीला शिक्षा होईल. असा गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर घटनेनुसार पोलिसांनी सदर गुन्ह्याचे पाळेमुळे शोधुन काढुन अशा देश विघातक नेटवर्कचा कोठे कोठे दंगली घडवायच्या, कोठे कोठे अशांतता पसरावयाची होती. अशा घटनांचा शोध लवकरात लवकर घ्यावा व सर्व आरोपींना अटक करावी. अन्यथा विश्व हिंदु परिषद व बजरंग दल नाशिक जिल्हा तीव्र आदोलन छेडेल याची दखल शासनाने घ्यावी असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.