सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन निवडणूक संपन्न
प्रगती पॅनलचे सहा तर एक अपक्ष विजयी

प्रगती पॅनलचे सहा तर एक अपक्ष विजयी
सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन निवडणूक संपन्न
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर दि. 25 मे 2025
www.gurunews.co.in
सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन निवडणूकीत सात जागांसाठी झालेल्या प्रगती पॅनलच्या सहा तर अपक्ष एक जागा निवडून आली.
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०३० करिता तेरा उमेदवार असून, सर्वसाधारण गटातून सात जागासाठी निवडणूक झाली. तर बिनविरोध सहा जागा यापूर्वी निवडून आल्या आहेत.
उमेदवाराचे नांव व मिळालेली मते
1) कातकाडे संग्राम शिवाजी = 34
2) पवार अनिल गंगाधर = 31
3) शेख इलाहीबक्ष नबाब = 31
4) चिने मच्छिंद्र सिताराम = 29
5) वारुंगसे अरुण नामदेव = 29
6) पवार भाऊसाहेब आनंदा = 27
7) अंकार राजेंद्र दत्तात्रय = 24
8) जगझाप राजेंद्र दत्तात्रय = 13
अशा आठ पैकी सात उमेदवार निवडून आले आहेत. निवडून आलेल्या उमेदवार यांचे खासदार मा. राजाभाऊ वाजे, श्री. नारायणशेठ वाजे, यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री. प्रभाकर जेजुरकर, ऍड. प्रदीप वारुंगसे, श्री. प्रकाश जेजुरकर, श्री. शाम कातकाडे, श्री. दिलीप कातकाडे, श्री. दंताराम डोमाडे, श्री. बाबजी पाटील, हे उपस्थित होते.
सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज दि. 25 रोजी मतमोजणी होऊन 36 मतदारांपैकी 36 मतदान झाल्याने 100 टक्के मतदान झाले. सर्वसाधारणच्या ७ जागांसाठी ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. सदर मतमोजणी आज झाली असून, निवडून आलेल्या उमेदवार यांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी केली. निवडणूक कामी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री. सुदर्शन तांदळे, मतदान केंद्राध्यक्ष श्री. नवनाथ गडाख, मतदान अधिकारी श्री. दत्ताभाऊ पगार, श्री. प्रशांत राजपूत, श्री. अनिकेत सोनवणे, मतदान कर्मचारी श्री. अक्षय चौधरी, मतदान प्रतिनिधी श्री. कांताराम माळी, श्री. बाळासाहेब आव्हाड, श्री. राजेंद्र घोलप, श्री. दिपक शेजवळ, कॅमेरामन दत्ताभाऊ जोशी आदीनी मतदान प्रक्रियेत काम पाहिले.
अनुसूचित जाती जमाती गटातून यापूर्वीच सौ. छाया राजेंद्र घोलप, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्गातून श्री. बाळासाहेब मुरलीधर आव्हाड, पगारदार-सेवक पतसंस्था गटातून श्री. कैलास देवराम पवार, महिला राखीव गटातून सौ. तेजश्री हेमंतराव वाजे, सौ. सुमन सोपान बोडके, तर इतर मागास प्रवर्गाच्या जागेवर कांताराम ठकाजी माळी यांची यापूर्वी बिनविरोध निवड करण्यात आली आहेत.