बारा बलुतेदार आलुतेदार महासंघ, सिन्नर तालुक्याच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव दिन साजरा

बारा बलुतेदार आलुतेदार महासंघ, सिन्नर तालुक्याच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव दिन साजरा
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर प्रतिनिधी :
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर जीवनाला योग्य निर्णय घेऊन जाणाऱ्या टप्प्यावर घवघवीत यश संपादन करून मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा गुणगौरव दि. 26 जून 2025 रोजी करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर जन्मोत्सव सोहळा व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बारा बलुतेदार, आलूतेदार महासंघ सिन्नर तालुका यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शाहू महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी. टी. गोसावी साहेब (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक) हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून श्री. किशोरशेठ राठी (उद्योजक), श्री. अरुण भाऊ नेवासकर (बारा बोलतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष), श्री. अशोकराव सोनवणे (संघटनेचे प्रदेश सचिव), श्री अरविंद क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्तित होते. सिन्नर सार्वजनिक वाचनालय,येथे
सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम साजरा करण्यात आला.
युवक युवतींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी गौरविण्यासाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यासाठी सन्मान पत्राचे वाटप करून समारंभपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी बारा बलुतेदार अलुतेदार समाजातील जवळपास 250 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
मान्यवरांच्या वतीने श्री. किशोरशेठ राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण उद्योग व्यापार व प्रशासन या संदर्भातील काही मुद्दे लक्षात आणून देत समाजातील विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षेच्याच मागे न लागता उद्योजकतेच्या मार्गावर पदार्पण करावे. अशी सूचना केली. वेळोवेळी कुठलेही मार्गदर्शन किंवा काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे दुसरे मान्यवर श्री. अशोकराव सोनवणे यांनी आपण बारा बलुतेदार, अलुतेदार महासंघ सिन्नरच्या वतीने जो गुणगौरव सोहळा आयोजित केला. हा खरोखरच खूप अवर्णनीय आहे. आपण हा हॉल पूर्ण खचाखच भरून टाकला व एक छान उपक्रम आपण या शहरात सुरू करत आहात त्याबद्दल संघटनेच्या वतीने अभिनंदन केले व पुढील वर्षी जेव्हा तुम्ही गुणगौरव समारंभ आयोजित कराल, त्यावेळी “सिन्नर रत्न पुरस्कार” सामील करा तो खर्च मी करण्यास तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिले.
श्री. अरविंद क्षीरसागर (जिल्हाध्यक्ष) सिन्नरची टीम खरोखरच खूप आकर्षक पद्धतीने रचनात्मक काम उभे करत आहे. त्याबद्दल अभिनंदनास्पद गौरव उद्गार काढले.
श्री. अरुण निवास करांनी सर्व विद्यार्थी व सत्कारार्थी तसेच बारा बलुतेदार अलुतेदार संघटनेस शुभेच्छा प्रदान केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. जावेद शेख सर यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरती विद्यार्थ्यांना उद्बोधन करत असताना छत्रपती शिवराय, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई व जिजाऊ मासाहेब यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. व शाहू महाराजांनी समाजातील वंचित घटकांना प्रथम आरक्षण मिळवून दिले. व आपल्या संस्थानाच्या कारभारात सामील करून घेतले विद्यार्थ्यांनी यापुढे मोबाईलचा वापर योग्य व कमी करावा. त्याची जितके फायदे तितकेच नुकसान आहे. प्रत्येकाने आपले ध्येय फिक्स करून त्या पद्धतीने मार्गक्रमस्त व्हावे. आमच्या आपल्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा असतील. यावेळी स्वयंस्कृतिने दोन विद्यार्थिनींनी ईश्वरी झगडे व इन्शा इम्तियाज सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गुणगौरव सोहळा आयोजित करून आम्हा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्याबद्दल संघटनेचे आम्ही आभारी आहोत असे प्रतिपादन कुमारी झगडे हिने केले तर, इन्शा सय्यद हिने आपल्या भाषणाची सुरुवात इंग्लिश मध्ये करत विद्यार्थिनींवरती विशेषता मुलगी म्हणून जन्म मिळाल्यानंतर ते संपूर्ण जबाबदारी पार पाडेपर्यंत कुठल्या नजरेने आमच्याकडे बघितले जाते. पण नारी ही अबला नसून एक शक्ती आहे. आणि तिने ठरवले तर ती देशातील सर्वच पदांवरती विराजमान दिसेल. फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि माझ्या इतर मैत्रिणींनी सुद्धा ती इच्छाशक्ती आपल्या स्वतःमध्ये जागृत करावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण गोसावी साहेबांचे होते यामध्ये संघटनेसह सर्व कार्यकर्ते व उपस्थित विद्यार्थी पालक यांचेही कौतिक करत आपण सर्वजण अशाच पद्धतीचे संघटनात्मक काम उभे करूया, एकमेकाची साथ घेऊया व पुढील भविष्यात याहीपेक्षा अधिकाधिक मोठमोठे सोहळे व उपस्थित विद्यार्थ्यांना उच्चस्तपदस्थ सत्कार सोहळे आमच्याकडून घडून यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर विष्णू अत्रे, दत्ताजी गोळेसर, किरण भाऊ जाधव, वसंतराव भावसार, अशोकराव सोनवणे ,दिलीपराव बिन्नर, बाळासाहेब सदगीर, मनोहर रूपनारायण, गावडे साहेब, रामचंद्र नरोटे, भाऊसाहेब पवार, कैलास झगडे, भगवान ठाणेकर, दीपक सुडके, प्रकाश खारके, बाबू सय्यद, दत्तूशेठ गोफणे, बंडु जाधव, विशाल चव्हाण, राजेंद्र जाधव, राजेंद्र कांबळे सर, भाऊसाहेब शिलावट, कैलास श्रीमंत, एकनाथ देवकर, महेंद्र कानडी, योगेश जाधव, इंद्र गिरी, विजय मोरे, लक्ष्मणराव बर्गे, धोंडीबा शिंदे आदींनी प्रयत्न केले.
यावेळी वाचनालयाचा हॉल संपूर्णपणे गच्च भरून बाहेरही दीड दोनशे लोक उभे होते. अतिशय भरभरून अशी साथ विद्यार्थी पालक व हितचिंतकांची या कार्यक्रमासाठी लाभली. संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सिन्नर घरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख श्री. किरण भाऊ कोथमीरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल सरवार (जिल्हा सचिव) यांनी केले तर, प्रास्ताविक श्री. विनोद शितोळे (शहराध्यक्ष) यांनी केले. यशस्वीतेचे सर्व नियोजन श्री. भाऊसाहेब पवार (तालुका सचिव) यांनी पार पाडले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाच्या समारोप करण्यात आला.