अग्निवीराचा ढग्या डोंगरावर गौरव सोहळा

अग्निवीराचा ढग्या डोंगरावर गौरव सोहळा
गुरु न्यूज नेटवर्क : सिन्नर, www.gurunews.co.in
ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीने अग्निवीर निवड झाल्याबद्दल जोंधळे यांचा सत्कार उद्योगपती उदय गोळेसर यांच्या हस्ते ढग्या डोंगर येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ढग्या डोंगर सेवक सुरेंद्र क्षत्रिय, महेश काकड, श्रीकांत लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्या ढग्या डोंगर परिसर संपूर्णपणे हिरवागार झाला असून शुद्ध हवा आणि नैसर्गिक वातावरणामुळे सिन्नर शहर व आजुबाजूच्या अकॅडमीमधील विद्यार्थी दररोज ट्रेकिंगसाठी येथे येतात. विशेष म्हणजे ढग्या डोंगरावर संवर्धन समितीने उभारलेला ग्रीन जिम अग्निवीरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. याचा लाभ जोंधळे यांनी भरतीपूर्व तयारीदरम्यान घेतला.
भरतीपूर्वी जोंधळे यांनी डोंगरावरील मंदिरात नवस केला होता. भरतीत यश मिळाल्यानंतर त्यांनी ११ किलो पेढे वाटून नवस्फूर्ती व्यक्त केली. याच निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना सुरेंद्र क्षत्रिय म्हणाले, “जर मोकळ्या हवेत फिरायचे असेल, तर काश्मीर किंवा महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही. ढग्या डोंगरावर या, इथे तुम्हाला ढगांचा स्पर्श होईल,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय गोळेसर होते. ढग्या डोंगर ट्रॅकर ग्रुप, संवर्धन समितीचे सर्व सेवक आणि पुजारी यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.