त्रिपुरा पौर्णिमा काकड आरतीसाठी सीमा कोकाटे व सिमंतिनी कोकाटे उपस्थित

त्रिपुरा पौर्णिमा काकड आरतीसाठी सीमा कोकाटे व सिमंतिनी कोकाटे उपस्थित
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर येथील भैरवनाथ महाराज मंदिरात गेल्या 69 वर्षाची परंपरा चालू ठेवत आज त्रिपुरा पौर्णिमा निमित्ताने काला प्रसाद व काकड आरती (काकडा भजन) करण्यात आली. यावेळी वै. ह. भ. प. त्रंबक बाबा भगत यांनी स. न. 1955 पासून काकड आरती परंपरा सुरू केली आहे. या आरतीसाठी सौ. सीमा माणिकराव कोकाटे व सिमंतिनी माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक महिलांनी उपस्थिती दर्शविली होती.
काकडा भजन परंपरा ही महाराष्ट्रात गावोगावी साजरा होणारा धार्मिक उत्सव असून, कोजागिरी पौर्णिमा या दिवशी सुरुवात करण्यात येते व त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी समारोप उत्सव साजरा करण्यात येतो. ही परंपरा साधुसंतांनी सुरू केली असून, या चातुर्मास समाप्तीनंतर संन्यासी धार्मिक स्थळी देवदर्शनासाठी भ्रमंती करतात.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. विलास महाराज भगत, ह. भ. प. बाळासाहेब देशपांडे, श्रीरंग कवडकर, राजेंद्र रेवगडे, ज्ञानेश्वर हांडे, वामनराव गाडे, पप्पू लोखंडे, गोजरे गुरुजी, नवनाथ मडवई, नारायण वाघ, चैतन्य पगार, जयसिंग परदेशी, आदींनी केले होते. सदर कार्यक्रमासाठी सौ. राधाताई कवडकर, सुनिता वाळुंज, सुषमा देशपांडे, मनीषा रेवगडे, भारती हांडे, प्रिया परदेशी, सुजाता देशमुख, सविता गाडे, आदींनी या कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या.