वरघोडा मिरवणुकीने नवीन नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फीटले

वरघोडा मिरवणुकीने नवीन नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फीटले
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
परिसरातील महाराणा प्रताप चौकात असलेल्या जैन स्थानक मध्ये सामुहिक ८५ आठ दिवसिय निरंकार उपवासाचा भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वरघोडा मिरवणुकीने नवीन नाशिककरांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फेडले होते .
येथील जैन स्थानक मध्ये राजस्थान विरांगना दिवाकर ज्योती , प. पू . जयश्रीजी म . सा . , प .पू . राजश्री म . सा . , प . पू . समिक्षाजी म . सा . यांच्या सानिध्यात चार्तुमास मोठया उत्साहात सुरू आहे . त्यांच्या प्रेरणेने सामुहिक पंच्यांशी आठ दिवासिय निरंकार उपवास निमित्त पवन नगर जैन स्थानक येथुन ८५ तपस्यांचा भव्य वर घोडा मिरवणुक काढण्यात आली . या वर घोडा मिरवणुकीचा लाभ बँगलोर निवासी पन्नालाल कोठारी परिवाराने घेतला होता . या वरघोडा मिरवणुकीत सुमारे १५ ते २० बग्गीतुन तपश्र्चर्याची पवननगर ,उत्तमनगर , विजय नगर मार्गे वाजत गाजत विविध भक्ती संगीतावरच्या नृत्यात जैन बांधव सहभागी झाले होते . वरघोडा मिरवणुकीचा महाराणा प्रताप चौकातील जैन स्थानक येथे समारोप करण्यात आला . सगळ्यांसाठी मोहन चोरडीया , नंदाबाई लुणावत , वर्षा बंब यांनी गौतम प्रसादी लाभ घेतला .
यावेळी पवननगर संघपती अनिल कर्नावट , मोहन चोरडीया , चेतन बंब ‘ सुभाष गांधी , हर्षद धाडीवाल , प्रकाशचंद भन्साळी , सुमित मंडलेचा , विजय लुणावत , मयुर सुराणा , सतिश कोटेचा आदी उपस्थित होते . तर कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रेमचंद डुंगरवाल , प्रकाशचंद ललवाणी , विजय गोठी , प्रवीण मोदी , राजेंद्र लोढा , डॉ . संदीप मंडलेचा , पवन गांधी , जितेंद्र लोढा व आदींनी परिश्रम घेतले .