सिन्नर शहरातील अतिक्रमण हटवण्यात नवीन मुख्याधिकारी कदम यांना यश

सिन्नर शहरातील अतिक्रमण हटवण्यात नवीन मुख्याधिकारी कदम यांना यश
सिन्नर, गुरू न्यूज नेटवर्क | दि. 14 ऑगस्ट 2025, www.gurunews.co.in
सिन्नर शहराला गेल्या दोन ते तीन वर्षापासून सिन्नर नगरपरिषदेला मुख्याधिकारी असून – नसल्यासारखे होते. त्याचे कारण त्यांनी फक्त खुर्ची लाऊन धरली मात्र कामाचा बोजवारा झाला त्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही. मात्र नवीन मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी पदभार स्वीकारताच सिन्नर शहरात अतिक्रमण केलेल्या दुकानांना नोटीस देऊन केलेले अतिक्रमण काढण्यास सागितले, की जेणेकरून नुकसान होणार नाही . याची त्यांनी काळजी घेतली. मात्र नोटीस देऊन पण अतिक्रमण काढले नाही त्यांना मात्र नुकसानीला सामोरे जावे लागले.
सिन्नर मध्ये सलग तीन दिवस अतिक्रमण मोहीम राबविण्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी सिन्नर पोलीस यांना पाचारण करून, सिन्नरच्या विविध भागातील असलेले अतिक्रमण हटविण्यात आज तरी यश प्राप्त केले आहे. मात्र भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नाही. यासाठी सदैव एक टीम कार्यरत ठेवणे अपेक्षित आहे.
अतिक्रमण मोहीम राबवित असताना कोणावरही अन्याय झाला नाही. आणि कोणालाही पाठीशी घातले नाही. त्यामुळे अतिक्रमण केलेले दुकानदार यांनीही सहकार्य केले असून, त्यांनीही मोठ्या मनाने पालिकेला एक प्रकारे मदत केली हे म्हणणे वावगे होणार नाही. स्वच्छ सिन्नर, सुंदर सिन्नर दिसत असून, रस्ते मोकळा श्वास घेत असल्याचे दिसत आहे.
अशा कर्तव्य दक्ष अधिकारी यांची सिन्नर शहराला गरज होती. ज्याप्रमाणे अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच पुढे गणपती उत्सव सारखे सण जवळ आले आहेत. त्यादृष्टीने शहरातील पडलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुख्याधिकारी कदम यांनी पुढाकार घेऊन काम केल्यास, आणि त्याच बरोबर पाणी समसेवर लक्ष दिल्यास सिन्नरची जनता खुश झाल्याशिवाय राहणार नाही.
फोटो सहकार्य दत्ता जोशी, सिन्नर