मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सहकारी महिलेशी अश्लील वर्तन व जातिवाचक बोलल्याचा प्रकार

मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सहकारी महिलेशी अश्लील वर्तन व जातिवाचक बोलल्याचा प्रकार
सिन्नर | गुरू न्युज नेटवर्क :
मुद्रांक नोदणी कार्यालयातील खासगी ऑपरेटर महिलेशी वारंवार जातिवाचक बोलून, लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचे सदर महिलेने फिर्याद दाखल करते वेळी केली. सदर कृत्य केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध उपनगर पोलिस ठाप्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाजगी ऑपरेटर असलेल्या महिलेला कामाची गरज असल्याने तिच्या मजबुरीचा फायदा घेत असल्याने, नाशिक रोड येथील पांडित महिलेने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की १ ऑक्टोबर २०२० ला दुय्यम निबंधक कार्यालय, वर्ग दोन येथे खासगी ऑपरेटर म्हणून रुजू झाली होती. त्यानंतर दुय्यम निबंधक प्रवीण चौधरी यांनी तिच्याशी अश्लील भाषेत बोलून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. सुट्टीच्या दिवशी कार्यालयात बोलावून शरीरसुखाची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. नोकरीची गरज असल्याने काही दिवस शांत राहिले. त्यानंतर तिने एस. टू. इंफोटेक कंपनीचे इंजिनिअर देवीदास कोल्हे यांना हा सर्व प्रकार सांगितला असता, त्यांनी नोकरीत तडजोड करावी लागते, असे सांगून नाशिकच्या बाहेर एकटे भेटण्यास सांगितले. त्यानंतर तिची सहाय्यक निबंधक कार्यालयात बदली झाल्यानंतर सहाय्यक जिल्हा निबंधक कैलास दवंगे यांनी देखील पीडित महिलेजवळ शरीरसुखाची मागणी केली असल्याचा आरोप केला गेला आहे. २०१३ मध्ये पीडित महिलेची सित्रर कार्यालयात बदली झाल्यानंतर लिपिक असलेले प्रभारी अजय पवार यांनी त्या महिलेला चौधरी व कोल्हेसाहेबांनी बोलावले आहे, असे सांगितले. त्यानंतर सिन्नर कार्यालयातील दुय्यम निबंधक सागर बच्छाव यांनी देखील जानेवारी २०२४ मध्ये पीडित महिलेशी गैरवर्तन करून जातियवाचक उद्धार केला. साहेबांचे नाव घेऊ नको, ते तुला पैसे देतील, तडजोड करून घे असे आमिष दाखविले.
उपनगर पोलिस ठाण्यात सहजिल्हा निबंधकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महसूल विभागात खळबळ माजली असून, पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
तसेच सदर अधिकारी दस्त नोदणी करणेकामी टेबलाखालून हात ओले केल्याशिवाय कोणतेही काम करत नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. असे अधिकारी गैरमार्गाने पैसे मिळवत असल्याने त्या पैशाचा वापर अशा कृत्य करण्यास वापरतात हे सर्वत्र चर्चा होत आहे.