महाराष्ट्रातील विधान सभेचा निकाल हा केवळ हिंदुत्वाचाच विजय -. बाळासाहेब देशपांडे

महाराष्ट्रातील विधान सभेचा निकाल हा केवळ हिंदुत्वाचाच विजय -. बाळासाहेब देशपांडे
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
महाराष्ट्रातील विधानसभा 2024 चा निकाल हा केवळ आणि केवळ हिंदुत्वाचाच विजय असल्याचे मत विश्वहिंदुपरिषदचे नाशिक जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या EVM मशीनला दोष देवुन त्या विरोधात रणशिंग फुंकण्याची भाषा काँग्रेस व इतर त्यांचे मित्रपक्ष म. वि. आ. करीत आहे. व 6 महिन्यांत कोणता चमत्कार झाला हे विचारत आहे. परंतु याला कारण एकच आहे की, जे मागिल 3 वर्षात महाराष्ट्रात झाले ते महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्रातील जनतेने एव्हढी राजकीय पक्षांची फोडाफोडी बघीतली नव्हती, ज्या पध्दतीने श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ती पध्दत साधुसंतांच्या भुमीने पवित्र झालेल्या महाराष्ट्राला रुजली नव्हती याचा संताप जनतेच्या मनात होता म्हणुन लोकसभेच्या निवडणुकीत म. वि. आ. ला लोकांनी उत्स्फुर्त मतदान केले व मविआचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडुन दिले. परंतु निवडुन आलेल्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीत फडकणारे हिरवे झेंडे व उधळला गेलेला हिरवा गुलाल बघुन व देण्यात आलेल्या घोषणा बघुन आपण मोठी चुक केली की काय? असा प्रश्न मतदारांना पडला व त्याचे पडसाद सोशल मिडीयावर दिसुन आले व झालेली चुक आपण वेळीच सुधारली पाहिजे, मतदान केले पाहिजे हे जागृत मतदारांना कळुन आले.
त्यात विधान सभेच्या निवडणुका लागण्याचे चिन्ह दिसताच हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्या त्यात विश्व हिंदु परिषदने, बजरंग दलाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, दुर्गवाहिनी मातृशक्ती अशा सर्व संघटनाची भुमिका महत्वाची ठरली. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साधु संतांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावला त्यात वारकरी धर्म परिषदेंचे आयोजन करुन वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार, संतांचे एकत्री करण व एकमत झाल्याने व त्यांनी समाजात केलेल्या प्रबोधनाने निवडणुकींच्या निकालाचे चित्र बदलले.
त्यातच कोजागिरी पोर्णिमा ते त्रीपुरी पोर्णिमा या कालावधीत होणाऱ्या काकडा आरतीस जमणारे संत, किर्तनकार, प्रवचनकार व भाविक यांची नित्य भेटीगाठी झाल्याने कोठेही संभाशन गॅप राहिली नाही व आज कोणत्या गावाला कोणाला भेटायचे ते ठरुन त्याचे रिर्पोटींग व्हायचे त्यात वारकरी असल्यामुळे जात फॅक्टर हे बंधन नव्हते त्यामुळे प्रचारात अडचन नव्हती. हिंदुत्वाच्या विचारांचे मुद्दे मतदान करण्याचे आव्हान याने महाराष्ट्र ढवळुन निघाला व त्याचे रुपांतर महायुतीस व मित्र पक्षास मिळाले. निवडणुक व राजकारण म्हटले की, जनते समोर पैशांची उधळण होते हे डोळ्यासमोर येते. परंतु असे नसते धर्मासाठी सर्व साधुसंत एकत्र येऊन कुठलिही अपेक्षा न करता जेव्हा स्वखर्चाने कार्य करतात तेव्हा काय होते ते या निवडणुकीच्या माध्यमातुन दाखवुन दिले आहे.
संविधानातील काही कायदे बदलने गरजेचे आहे ते शासनाने बदलले पाहिजे. आज संविधानात बदल करायचा नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेसने मुळ संविधानात 70 पेक्षा जास्तवेळा संविधानात बदल केलेला आहे. त्यातील बरेच बदल हे समाजात तेढ पसरविणारे व भविष्यकाळ अस्थिर करणारेच आहे. एक देश एक कायदा, समान नागरी कायदा असे कायदे सरकारने आता आणावेत.
मुख्य म्हणजे सरकारी अधिकारी कोरोना काळानंतर प्रचंड भ्रष्ट्राचारी झालेले आहेत त्यांना कडक भाषेत सुचना देणे गरजेचे आहे. प्रत्येक खात्याचा अधिकारी आम्हांस वरती पैसे द्यावे लागतात हे सांगतो व सामान्य जनतेकडुन अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करतो हे सामान्य जनता रोजच अनुभवत आहे. असे अधिकारी वरती कोणाला पैसे देतात याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे.
ज्या वारकऱ्यांनी जिवाचे रान करुन महायुतीचा प्रचार स्वखर्चाने केला त्यांची एकच अपेक्षा आहे की, देहु, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंढरपुर, या मार्गांवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कायम स्वरुपी सर्व सुविधांयुक्त निवारा शेड वारकऱ्यांसाठी बांधण्यात याव्यात.
तसेच युवकांनी महायुती ला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्यांचे करीता आयटी पार्क उभारणे, निरनिराळे जपान पॅटर्न, चिनी पॅटर्न वापरुन कुटीर उद्योग यास चालना द्यावी त्यासाठी त्यांना कर्ज पुरवठा करावा. तसेच त्यांना देश विदेशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हे मोठे कार्य शासनाला हाती घ्यावे लागेल. तरच भविष्यात बेरोजगारीची समस्या राहणार नाही.
ही अपेक्षा या सरकारकडुन विश्व हिंदु परिषदेची आहे.
विश्व हिंदु परिषद
संजय (बाळासाहेब) देशपांडे
अध्यक्ष नाशिक जिल्हा