ताज्या घडामोडी

जीवनात राजकारण व समाजकारण निरपेक्ष भावनेने करणारे, काका….

जीवनात राजकारण व समाजकारण निरपेक्ष भावनेने करणारे, काका….

गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर

स्व. पद्दमाकर शांताराम गुजराथी (पदुकाका) काका आपल्यातून जाऊन साधारणता तीन वर्ष होत आहे. परंतू काका आपल्यात नाही यावर अद्यापही विश्वास बसायला तयार नाही. आजही भाजपाच्या कार्यक्रमात काका नाही हे मनाला न पटणारे आहे. काकाबरोबर बैठकांना व पक्षाच्या अधिवेशनाला जाण्याचा योग आल्याने भारतीय जनता पक्षांच्या राष्ट्रीय व राज्यपातळी वरील वरीष्ठ नेत्यांचा निकटचा संबंध आला यावेळी एक सतत जाणवायचे काकांशी ही सर्व मंडळी खुप आपुलकीने वागायचे, परंतु काकांच्या पक्षनिष्ठा, पक्षासाठी समर्पित होऊन काम करणे व वेळप्रसंगी पक्षासाठी पदरमोड करून स्वता आर्थिकझळ सोसण्यास काकांनी कधी मागेपुढे बघितलेले नाही. हे सर्व निरपेक्ष भावनेने करीत होते. म्हणून जिल्ह्यातील वरीष्ठ मंडळीत काका विषयी एक प्रकारे आदरयुक्त धाक व प्रेम होते.
     याचमुळे ही सर्व मंडळी नम्रपणे नतमस्तक होतांना मी बघितलेले आहे. त्यामुळे काकांचे महत्त्व मला अल्पवयांतच जाणवले. काकांची प्रामाणिक राजकारणी म्हणून जिल्हयात ओळख होती व त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणा-यांना सुध्दा मानसन्मान मिळत होता. काकांवर मा. पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर पगडा असल्यामुळे मला पक्षात कोणतेही पद नको, पण माझा पक्ष मोठा झाला पाहीजे. ही त्यांची भावना नव्या पिढीला व आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांना खुपच प्रेरणादायी ठरत आहे. काकांकडे जिल्हा अथवा राज्यपातळी वरील नेते पक्षसंघटनेच्या निमित्त अथवा बैठकीला येत असे यात विशेषता ‘स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांवर’ काकांचे व्यक्तीगत अतिशय जवळचे संबंध होते व या स्नेहांमुळे साहेब नाशिक जिल्ह्यात आले तर काकांना व काकीना भेटल्या शिवाय राहत नव्हते, विशेषता काकीच्या हातचे जेवण स्व.मुंडे साहेबांना खुप आवडत, गणेशपेठेतील काकांचे दुकान म्हणजे पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आपले हक्काचे ठिकण, ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते असतील किंवा जिल्ह्यातून आलेले पक्षाचे वरीष्ठ नेते, पदाधिकारी हे पाहील्यांदा काकांना भेटायला येणार पक्षाच्या बैठका या तर जवळ जवळ काकांच्याच निवासस्थानी होत होत्या, पक्षाचे अध्यक्ष बदलत होते परंतु बैठकीचे ठिकाण हे शेवटपर्यंत काकांचे निवासस्थानच व पक्षकार्यालय म्हणून राहिले. येणारे कार्यकर्ते असतील किंवा वरिष्ठ नेतेमंडळी यांना काका असतील किंवा काकी अथवा कुटुंबातील इतर सदस्य हे आनंदाने आग्रह करीत चहापाणी अथवा जेवण केल्या शिवाय जाऊन दिले नाही. अन्य विरोधी पक्षातील नेते अथवा कार्यकर्त्यांचा काकांनी कधीच दुस्वास केला नाही व प्रत्येकांशी आपुलकीने वागत असल्यामुळे काका लहान व मोठ्या दोन्ही स्तरातील लोकांना आपलेसे वाटे ते म्हणजे राजकारणातील एक “अजातशत्रू” असणारे व्यक्तिमत्व होते. काकांनवर लहानपणा पासून संघाचे संस्कार व वडीलबंधू स्व. नानासाहेब हे आणीबाणीच्या काळात जेलमध्ये बंदी होते. व त्यावेळी खुपचं कमी वयात कुटुंबांची व जनसंघाची जबाबदारी आली व काकांनी 1967 साली जनासंघाकडून दिवा या चिन्हावर सिन्नर नगरपालिकेची निवडणूक लढवली. सिन्नर व्यापारी बँकेची निवडणूक लढवत व्हा.चेअरमन म्हणुन कामकाज बघितलेले आहे. सन १९८० साली, मुंबई येथे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना कार्यक्रमाला सिन्नर मधून काका व सहकारी उपस्थितीत होते, सिन्नरच्या सार्वजनिक व सामाजिक जीवनात सतत पुढे असल्यामुळे या सर्व गोष्टीची दखल घेऊन सिन्नर नगरपालिकेने  “सिन्नर भूषण” हा पुरस्कर देऊन सन्मानीत केले. आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत काका पक्षकार्यसाठी कार्यरत राहिले.भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत पाईक, स्वच्छ प्रतिमा निरपेक्ष व निष्कलंक राजकारणी म्हणून काकांची प्रतिमा जिल्ह्यात व वरीष्ठ पातळीवर राहीलेली आहे, काकांच्या पश्चात त्यांचे मोठे चिरंजीव संदीपशेठ पक्षीय, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमात स‌हभागी होत असतात अर्थात काका हयात असतांना कुटुबांतील लहान मोठे प्रत्येक सदस्याने प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे सहभागी होतेच, मी काकांच्या सहवासात एकदम विद्द्यार्थ्यी अवस्थेत संघ स्वंयसेवक म्हणून आलो व त्यावेळी म्हणजे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पाहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा.मंत्री स्व. डाॅ. डि. एस. आहेर यांचा प्रचार केला, या संपुर्ण निवडणुकीची जबाबदारी काका कडेच होती काकांनी ही जबाबदारी स्वताला झळ सोसून व पुर्णपणे झोकून देऊन निवडणूकीत धावपळ केली व स्व.आहेर हे प्रचंड मतांनी विजयी झाले व त्यात अर्थातच सिन्नरचा सहभाग मोठा होता,पुढे 1996 मध्ये अवघ्या 22 वर्षी काकांनी आग्रहाने मला नगरपालिकेची निवडणूक लढायला लावली व तेव्हापासून एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी सक्रिय झालो व पक्षाचा तरुण कार्यकर्ता अशी प्रतिमा तयार झाली,काकांनी माझ्या सारखे खुप कार्यकर्ते पक्षात आणले व त्यांना आपल्या घरच्या सारखे संभाळले,काका हयात असतांना माझ्या सारख्या एका लहान कार्यकर्त्याला खुप सहवास लाभला.मी स्वताला खुप भाग्यवान समजतो,काकासारखे व्यक्तिमत्व होणे नाही…!!

शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी काकांना आपल्यातून जाऊन तीन वर्ष होत आहे, तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने परमेश्वर काकांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

शब्दरचना

श्री. राजेश कपूर (खत्री)
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, सिन्नर

Chief Editor

www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. gurunewssinnar@gmail.com - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी Digital Media Ethics Code भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. (तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये