पोलीस आणि आर्मीत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांना डॉक्टर नागरे कडून प्रोत्साहन

पोलीस आणि आर्मीत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुला मुलींना डॉक्टर नागरे कडून प्रोत्साहन
सिन्नर । गुरु न्युज नेटवर्क : www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांची नोकरीसाठी असलेली तळमळ आणि धडपड करत प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी आर्थिक परिस्थिती साथ देत नसताना अनेक गोष्टींना सामोरे जाऊन यश पदरात पाडण्यासाठी सतत अनेक संकटांचा सामना करत असतात. त्यात पोलीस भरती आणि आर्मीत भरती होण्यासाठी कसरत करत असताना, पायात स्पोर्टचे बुट नसताना ग्राउन्डवर पळण्यासाठी एकमेकांमध्ये चढाओढ सुरू असते. यातून पळण्यामध्ये आपला स्टॅमिना वाढविणे हा उद्देश असतो. परंतु हे करत असताना त्यांच्या पायात व्यवस्थित स्पोर्ट बूट नसल्याचे डॉ. आनंद नागरे यांच्या लक्षात आल्याने, त्यानी २०-२५ मुलांना दिवाळी भेट म्हणून ब्रँडेड स्पोर्ट बुट दिले. त्यामुळे नोकरीच्या तयारीची कसरत करत असनाचा मुलांचा उत्साह वाढला व त्यांच्या चेहऱ्यावरचा आंनद त्याना लपवता आला नाहीं. अशा या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा असुन, अशाप्रकारे दानशुर नागरिकांनी पुढे यावे ही सदिच्छा!