क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने राजस्थान भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत
राजस्थान नाशिक विशेष रेल्वेसाठी प्रयत्न करणार - श्रवण सिंह बगड़ी

क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने राजस्थान भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत
राजस्थान नाशिक विशेष रेल्वेसाठी प्रयत्न करणार – श्रवण सिंह बगड़ी
नाशिक | गुरु न्यूज नेटवर्क : दि.२७ जुलै :- www.gurunews.co.in
नाशिकमध्ये मोठ्या संख्येने राजस्थानी बांधव राहतात. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर नाशिक राजस्थान विशेष रेल्वेसाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन राजस्थान भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी यांनी दिले.
राजस्थान भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी यांनी नाशिकमधील क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तेजपाल सिंह सोढा, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड,
क्षत्रिय समाज फाउंडेशनके सचिव श्रवण सिंह शेखावत, वरिष्ठ सल्लागार रणजीत सिंह चुंडावत, तेजपाल सिंह शेखावत, मोहन सिंह शेखावत, दयाल सिंह चौहान, अमित जी गोयल, चिरंजीवी लाल कुमावत, गिरवर सिंह राठौड़, संदीप सिंह राठौड़, राजेश शर्मा, बजरंग सिंह शेखावत, शिव सिंह शेखावत, चैनसिंह रामसिंह नरूका, नरेंद्र सिंह जोधा, प्रभु सिंह शेखावत, मनोहर सिंह शेखावत, महेंद्र सिंह राजपूत, रामसिंह राजपूत, बाबूलाल स्वामी, विशाल पाठक, बलवीर सिंह शेखावत, महिपाल सिंह शेखावत, जितेंद्र सिंह शेखावत, अर्जुन सिंह चौहान, भगवान सिंह राठौड़, अंबे लालजी, प्रेम सिंह राजपूत यांच्यासह राजस्थानी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी राजस्थान भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी म्हणाले की, क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने नाशिक मध्ये राहणाऱ्या राजस्थानी बांधवांचे संघटन करण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच राजस्थान वरून नाशिक मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सुविधा करण्याची व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. संघटनेचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर अनेक राजस्थानी बांधव हे नाशिक मध्ये येतील त्यासाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी व्हावी यासाठी आपण विशेष रेल्वे सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करू असे भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करतांना तेजपाल सिंह सोढा म्हणाले की, नाशिक ही धार्मिक नगरी असून याठिकाणी देशभरातून भाविक येतात. राजस्थान मधून देखील भाविक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये येत असतात. मात्र नाशिक ते राजस्थानला जाणे येण्यासाठी कुठलीही विशेष रेल्वे नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे व केंद्र सरकारकडे नाशिक ते राजस्थान स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. याबाबत भाजपा प्रदेश महामंत्री श्रवण सिंह बगड़ी यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी संघटनेच्या वतीने तेजपाल सिंह सोढा यांनी केली.