महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन च्या संचालकपदी नयनकुमार निऱ्हाळी यांची निवड

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन च्या संचालकपदी नयनकुमार निऱ्हाळी यांची निवड
सिन्नर : गुरू न्यूज नेटवर्क, www.gurunews.co.in
सिन्नर येथील नयनकुमार नंदकिशोर निऱ्हाली यांची जी. एस. टी टॅक्स प्रॅक्टिसनर्स ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मा. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या नूतन अध्यक्षा सौ. ला. ज्योती निऱ्हाळी यांचा सत्कार मा. आमदार माणिकराव कोकाटे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच पदग्रहण समारंभासाठी मा. एम. जे. एफ. ला. विजयजी सारडा माजी प्रांतपाल व शपथ प्रधान अधिकारी यांचे हस्ते होणार आहे. आणि नूतन सभासदांचा शपथविधी मा. ला. कांतीभाई पटेल माजी झोन चेअरपर्सन व लायन्स ट्रस्ट अध्यक्ष हे करतील. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. माणिकरावजी कोकाटे व मा. एम. जे. एफ. ला. गिरीषजी मालमाणी माजी प्रांतपाल व माजी मल्टीपल कौन्सील चेअरपर्सन उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रम बुधवार दि. ०९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिर, सिन्नर नगरपालिका समोर, हुतात्मा चौक, सिन्नर येथे होणार आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.