पत्रकार म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले प्रा. महाजन याना सुभेच्छा!

पत्रकार म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले प्रा. महाजन याना सुभेच्छा!
सिन्नर | दि. २३ सप्टेंबर २०२३, गुरू न्यूज नेटवर्क :
www.gurunews.co.in
प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविलेले आणि विद्यार्थी वर्गात मित्रत्वाचे नाते जोपासणारे आदरणीय गुरू म्हणून सर्वांना परिचित असलेले व त्याच बरोबर पत्रकार क्षेत्रात अनेकदा पुरस्काराने सन्मानित झालेले प्रा. जयंत महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना सर्व स्तरातून सुभेच्छा देण्यात येत आहे.
विविध क्षेत्रात नावलौकिक करत पुरस्कार मिळत असताना सर्व जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेत कधीही तडजोड केली नाही. कोणतेही पद मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब कधीच केला नाही. जे काही प्राप्त झाले ते कर्तृत्वातून मिळत गेले. प्राध्यापक, पत्रकार, आणि सहकार क्षेत्रात संस्थापक चेअरमन या पद भूषवत, संपादक या सारख्या पदाला शोभेल अशी कामगिरी करत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची नेहमी दक्षता घेतली. विनाकारण कोणावर डुक धरून कधीच पत्रकारिता केली नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जी काही मदत करता येईल ती करण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न केला आणि अद्याप सुरू आहे. अशा या जाणकार आणि मित्रत्वाचे नाते जपणारा विनोदी सभाव असणाऱ्या लोकप्रिय व्यक्तीला गुरू न्यूज नेटवर्क ग्रुप च्या वतीने, तसेच अतुल कासट, विलास पवार, डॉ. राजेंद्र कमानकर, मंदार दामले, सोपान पडवळ, नितीन खरणार, कैलास म्हस्के, बाळासाहेब देशपांडे, नारायण पवार, अनुपम डे, सदाशिव आघाने, कांताराम माळी, नामदेव कोतवाल, दिपक लोंढे आदींनी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी त्यांना प्रत्यक्ष भेटून सुभेच्छा देण्यासाठी अनेक मित्र नाशिक येथे जात होते, परंतु यावर्षी ते गेल्या दोन महिन्यांपासून विदेशात असल्यामुळे त्यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.