शौर्य जागरण यात्रेचे सिन्नरमध्ये आयोजन

शौर्य जागरण यात्रेचे सिन्नरमध्ये आयोजन
गुरू न्यूज नेटवर्क | दि. ०६ ऑक्टोबर २०२३
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा विश्व हिंदू परिषद षष्टीपुर्वी वर्षानिमित्त शौर्य जागरण यात्रेचे आयोजन सिन्नर येथे करण्यात आले आहे.
शनिवार दि. ७ आक्टोंबर २०२३ रोजी दुपारी 3 वाजता भव्य यात्रेचे नियोजन करण्यात आले असून, सिन्नर बस स्थानक येथून यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शौर्य यात्रा मार्ग – पांडुली ते हेवन इन हॉटेल, आडवा फाटा, सिन्नर बस स्टैंड, वंजार गल्ली, नवा पूल, नाशिक वेस, लाल चौक, भिकुसा कॉर्नर, शिवाजी चौक, लोंढे गल्ली, तानाजी चौक, मारुती मंदिर गावठा, भैरवनाथ मंदिर येथे सांगता होईल. तरी सर्व हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होवून शोभा वाढवावी असे आवाहान विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सिन्नरच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने धर्म जागरण सभेचे आयोजन सायंकाळी ७ वाजता श्री. भैरवनाथ महाराज पटांगण, सिन्नर येथे संपन्न होईल.
तसेच सिन्नर बस स्थानकावर यात्रेचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे व सिन्नर तालुका अध्यक्ष ह भ प विलास भगत, आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.