श्रीलेखा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. जयंत महाजन व्हा. चेअरमन बाळासाहेब देशपांडे

श्रीलेखा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. जयंत महाजन व्हा. चेअरमन बाळासाहेब देशपांडे
सिन्नर I गुरू न्यूज नेटवर्क :
तालुक्यातील प्रमुख अर्थवाहिनीमध्ये नाव घेतले जात असलेल्या, येथील श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. जयंत महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व्हाईस चेअरमन म्हणून बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब देशपांडे यांचीही बिनविरोध निवड झाली. गेल्या १९ वर्षांपासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत असते. यंदाही तीच परंपरा पुढे चालू राहीली.
श्रीलेखा पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीस प्रा. महाजन यांच्या नावाची सूचना सुदर्शन जेडगुले यांनी मांडली. त्यास सदाशिव आघाणे यांनी अनुमोदन दिले. तर देशपांडे यांच्या नावाची सूचना सोपान पडवळ यांनी मांडली. त्यास कुणाल चांदोरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक सर्वश्री कैलास म्हस्के, सोपान पडवळ, विलास पवार, डॉ. राजेंद्र कमानकर, सीमा महाजन, शिल्पा गुजराथी आदी उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीचा अहवाल सादर करून व्यवस्थापक कांताराम माळी यांनी मनोगत व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रीमती एस. एस. परदेशी यांनी काम पाहिले. संचालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल महाजन, देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजेश कपूर यांनी आभार मानले.