
मतदार करून टक्का वाडवा, देश सेवेत सामील व्हा
जनजागृतीसाठी उपक्रम
गुरू न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात दि. २० मे २०२४ रोजी मतदान होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. तरुण आणि नवमतदार यांच्यात मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नाशिक येथील जिल्हाधिकारी मा. जलज शर्मा यांच्यासह सिन्नर तहसीलदार मा. सुरेंद्र देशमुख, सहाय्यक निबंधक मा. संजय गीते यांनी तालुक्यातील सर्व सहकारी पतसंस्था पदाधिकारी यांना नाशिक जिल्ह्यातील मतदारांत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले.
यंदा लोकसभा निवडणुकीच्या चारही टप्प्यांत मतदानाची अपेक्षित टक्केवारी पूर्ण होऊ शकली नाही. पाचव्या व पुढील सर्व टप्प्यांत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनस्तरावर अनेकविध उपक्रम सुरू आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरात मतदान कमी होत असल्याचे आकडेवारीहून समोर येत आहेत. शाळा महाविद्यालय, विविध , संस्थांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकारी पतसंस्था पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त जनजागृती करून मतदानाचा टक्का कसा वाडेल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.