श्रीमती सविता कोठूरकर यांची भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी निवड

श्रीमती सविता कोठूरकर यांची भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्यपदी निवड
गुरु न्युज नेटवर्क : सिन्नर
www.gurunews.co.in
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, मा. चंद्रशेखर बावनकुळे, भा.ज.पा. जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. सुनीलजी बच्छाव, यांनी सिन्नर मधील अत्यंत प्रामाणिक व सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील कार्यकरत्या म्हणून त्यांची ओळख असणाऱ्या श्रीमती सविता कोठुरकर यांच्यावर विश्वास ठेवून “भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य” या महत्त्वाच्या पदावर नेमणूक केली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे व सर्व सन्माननीय नेत्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
त्यांची ही नेमणूक सिन्नर करांसाठी अभिमानाची गोष्ट असून, त्यांच्या कार्यकुशलतेला, संयमाला आणि प्रेमळ स्वभावाला आणि आगामी वाटचालीसाठी, सर्वश्री मा. नामदेवराव लोंढे, अतुल कासट, बाळासाहेब तुपे, नामदेव जाधव, कांताराम माळी, सुदाम गोळेसर आणि गुरु न्यूज नेटवर्क ग्रुप कडून खूप खूप शुभेच्छा!
महिला पदाधिकारी पदावर निवड होणे म्हणजे राजकीय, सामाजिक, व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील महिलांचा समावेश असू शकतो. त्यात सविता कोठूरकर या वहिनी हॉटेल व्यवसायकरत असल्याने त्यांचा सिन्नर मध्ये चांगला जनसंपर्क असून, सामाजिक कार्याची तळमळ आणि आवड ही महत्वाची गोस्ट मानली जाते.
महिला पदाधिकारी निवडल्याने, विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढतो आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळत असते. महिला पदाधिकारी महिलांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आणि त्यांच्या निराकरणासाठी कार्य करू शकतात. महिला पदाधिकारी इतर महिलांना प्रेरणा देतात आणि त्यांना विविध क्षेत्रात सहभागी होण्यास प्रोत्साहित करतात. त्यामुळे महिलांना न्याय मिळत असतो. हा उद्देश समोर ठेऊन भारतीय जनता पार्टी अशा पदाणवर सामाजिक नेतृत्व करणाऱ्या महिलांची नेमणूक करत असते.