आर्किटेक्ट व ठेकेदार यांच्यातील तणावाने नाशिकमधील सावरकर तलावाची लागली वाट

आर्किटेक्ट व ठेकेदार यांच्यातील तणावाने नाशिकमधील सावरकर तलावाची लागली वाट
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
नाशिक । येथील महापालिकेच्या गलथान कारभारामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात पोहोण्यासाठी येणारे अनेकजण जखमी होत आहेत. मोठा गाजावाजा करून या तलावाची उभारणी करताना आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतला होता. परंतु निवडणुकीच्या काळात आ. फरांदे यांच्याकडून दुर्लक्ष झाल्यामुळे संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी जे काम केले आहे, ते अतिशय चुकीचे केले. त्यामुळे दररोज अपघात होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येथील एक जलतरणपटू राज उत्तमसिंग नवीन शॉवर एरियात पडले आणि त्यांचा हात फ्रँक्चर झाला.
बाथरूम व शॉवरच्या जागेत चूकिचे काम केल्याने अपघात होत आहे. अपघात झाल्यास नुक़सान भरपाई मनपा व ठेकेदार यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी पुढे आली आहे. कारण स्विमींग केल्यानंतर शॉवर घ्यायला फार सांभाळून व भित भित जावं लागतं. पाय भिजलेले असतात, त्यामुळे मोठी रिस्क घ्यावी लागते. जलतरणपटूंचे ठेकेदाराशी बोलणे झाले आहे. तो जबाबदारी झटकून टाकत आहे. याला जबाबदार म्हणून तो आर्किटेक्ट पाटील यांना धरत आहे. कारण टाईल्स सिलेक्ट आर्किटेक्टने केल्या आहेत, असे त्याच्याकडून सांगीतले जाते. काही दिवसंपूर्व्ही बाबूभाई मेहता यांना पायाला लागले होते. त्यानंतर दररोज अपघात होत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही जलतरण तलावात शॉवरच्या परिसरात मऊ फरशी लावण्यात येत नाही. त्या ठिकाणी खरमरीत अशा प्रकारच्या फरशीची गरज असते. परंतु नाशिकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात संबंधित ठेकेदाराने ‘अफलातून’ डोके वापरून मऊ फरशी वापरली. त्यामुळे तलावात जाण्यापूर्वीच अनेकजण घसरून पडू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून अनेकजण पडल्यामुळे जलतरणपटूंमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक असुविधांनी हा तलाव चर्चेत येत आहे. थंडी असूनही मोठ्या प्रमाणावर तेथे गर्दी होतच असते. त्यातच जलतरणपटूंना देण्यात येणारे लॉकर्स खराब झाल्यामुळे बाजूला पडले आहे. लॉकर्सची सुविधा देखील देण्यात येत नाही. महापालिकेच्या आयुक्तांनी एकदा तरी या तलावाला भेट देण्याची गरज आहे. शॉवरच्या आसपास बसवलेली फरशी उखडून टाकून तेथे खरमरीत अशा प्रकारची फरशी बसविण्याची गरज आहे. तेथील असुविधांबद्दल जलतरणपटू रवींद्र बोडके, प्रा. संजय मिरासदार, नितीन साळवे, जॉनी शिंदे, आप्पा निकुंभ, शिवा देशमुख, शशीभाई कन्सारा, माजी नगरसेवक अण्णा धोत्रे, बाबा शहा, हरिभाऊ टिळे, माणिक काठे, राजू पटेल, विवेक कुलकर्णी, सुभाष कडलग, रमेश चौटालिया, पी. डी. जाधव, दिलीप जाधव, गणेश कांबळे, प्रा. जयंत महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.