हर्षद ( बुबूष ) देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने साहित्य भेट

हर्षद ( बुबूष ) देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने साहित्य भेट
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक-एक दिवस कमी होतोय! परंतु हर्षद देशमुख समाजातील गोरगरीब रुग्णाची सेवा करून त्यांचे अविष्यातील दिवस वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असतात.
परंतु आपल्याला आजपर्यंत जे बघायला मिळाले. ज्यांचा यात महत्वाचा वाटा होता अशा कै. किरण काका देशमुख यांची आठवण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने येते, ज्यांनी सिन्नरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे ईतरांना मदत करायचे काम केले, त्यांच्या नंतरही हे मदतीचे काम पुढे सुरू राहावे म्हणून मी माझ्या वाढदिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक नवीन उपक्रम सिन्नरकरांच्या सेवेत गेल्या 8 वर्षा पासुन चालु केला. काकांनी तालुक्यातल्या, शहरातल्या अनेक रुग्णांना दवाखान्यात पोहचविण्याचे काम केले, त्यांचे उपचार मोफत कसे होतील. ते सुरू कसे राहतील यासाठी प्रयत्न केले त्याच काकांच राहिलेले व्रत पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. रुग्णांना दवाखान्यातून घरी आल्यावर दोन ते तीन महिने अंथरुणात पडून राहावे लागते. त्यावेळी आवश्यक असणारा कॉट घरात उपलब्ध नसतो. त्यामुळे रुग्णाचे हाल होतात. असा कॉट आम्ही उपलब्ध करून देत आहोत. हे रुग्णांना त्यांचे अंथरुणात पडून राहावे लागणारे ते दिवस सुखाने कसे जातील, त्यांचे दुःख, हाल कमी कसे होतील या भावनेतून कॉट, व्हील चेअर तसेच वॉकर आम्ही रुग्णांना मोफत वापरायला देत आलो आहे. त्या वस्तुत भर घालत नवीन 4 बेड, वॉकर, कमोड चेअर, अशा वस्तुची भर घातली आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्राचे कृषिमंत्री नामदार श्री. माणिकरावजी कोकाटे साहेब यांचे योगदान कायम पाठीशी राहिले आहे.
यावेळी सदर वस्तूंचे युवा नेत्या सिमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते सेवेत लोकार्पण करण्यात आल्या, यावेळी विठ्ठलराजे उगले, हेमंत नाना वाजे, सुभाषजी कुंभार, योगेश आव्हाड, अमोल झगडे, नितीन भगत , विशाल बर्वे, अजय गोजरे आणि विरश्री प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोरगरीब रुग्णाची सेवा आणि मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे विरश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षद प्रभाकरराव देशमुख यांनी केले आहे.