सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णा भोसले

सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णा भोसले
पुणे आयुक्त कार्यालयीन अधीक्षक सन्माननीय कृष्णा भोसले यांची श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेस सदिच्छा भेट
गुरू न्यूज नेटवर्क │ सिन्नर │ दि. ०३ जानेवारी २०२६, www.gurunews.co.in
पुणे आयुक्त कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले सन्माननीय कृष्णा भोसले यांनी नुकतीच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था यांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान सहकार चळवळीच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सन्माननीय कृष्णा भोसले हे सहकार क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असून, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, समन्वय साधणारा व सहकारी नेतृत्वाचा आदर्श म्हणून त्यांची ओळख आहे. सहकार संस्थांच्या प्रशासनातील पारदर्शकता, शिस्तबद्ध कामकाज व सामान्य सभासदांच्या हिताचे निर्णय यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. भेटीदरम्यान पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. तसेच, सहकार संस्थांनी समाजाभिमुख कार्य करताना विश्वास, प्रामाणिकपणा व आर्थिक शिस्त यांचा पाया मजबूत ठेवावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या सदिच्छा भेटीमुळे पतसंस्थेच्या पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात सहकार क्षेत्र अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी ही भेट प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सन्माननीय महेश कुटे, श्रीलेखा पतसंस्था व्यवस्थापक कांताराम माळी, एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था व्यवस्थापन सुनील भाबड आधी व्यवस्थापक उपस्थित होते.



