सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्वाला शुभेच्छांचा वर्षाव

सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्वाला शुभेच्छांचा वर्षाव
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. ३ जानेवारी २०२६ www.gurunews.co.in
सहकार क्षेत्रातील अत्यंत विश्वासाचा आधार आणि अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलेले श्री. संजयजी गीते साहेब यांचा वाढदिवस विविध स्तरांतून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सहकारी संस्था मधील सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.

श्री. गीते साहेब यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वी ठरले असून अनेक युवकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन दिले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत सहकाराच्या माध्यमातून विकास साधता येतो, हा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून रुजवला आहे. त्यामुळेच ते आज सहकार क्षेत्रातील अत्यंत विश्वासाचा आधार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सहकार व समाजकार्यातून आणखी मोठे योगदान देण्याची संधी लाभो, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.
सहकार क्षेत्रातील आधारस्तंभ व जाणकार नेतृत्व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन श्री. नारायणशेठ वाजे, श्री. अरुणशेठ वारुंगसे, व्यवस्थापक श्री. महेश कुटे, श्रीलेखा पतसंस्थेचे चेअरमन श्री. प्रा. जयंत महाजन, व्यवस्थापक कांताराम माळी, आणि श्री. निमिष लाले, मधुकर कोकाटे, अविनाश कांडेकर, संजय पवार, सुनील भाबड, संदीप घोडे, मधुकर सदगीर, श्री. भगवान भोपी साहेब, राजेंद्र घोलप, संदीप रंधे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजय विखे,सौ. संगीता इघेवाड, सौ. सुनिता ठोंबरे, फरिदा शेख, सौ. ललीता कोतवाल, सौ. रुबीना शेख, अर्चना गायकवाड, सौ, निता कुलकर्णी, सौ. मनिषा बिडवे, सौ. उगले मॅडम, सौ. शैलजा यादव, सानिका माळी, यांनी श्री. गीते साहेब यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.