जॉगर्स क्लबच्या अध्यक्षपदी धावपटू दीपक भोसले यांची निवड

जॉगर्स क्लबच्या अध्यक्षपदी धावपटू दीपक भोसले यांची निवड
गोल्फ क्लबच्या मैदानात झाला नागरी सत्कार
गुरु न्यूज, नेटवर्क नाशिक । www.gurunews.co.in
जॉगर्स क्लबचे सभासद दीपक भोसले यांची जॉगर्सच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. गोल्फ क्लब म्हणजेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मावळते अध्यक्ष योगेश देशपांडे यांच्या हातून पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. जॉगर्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशात व परदेशात धावणे, पोहणे व सायक्लिंग या तीनही क्षेत्रात ते कार्यरत आहे. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सदस्य अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनीषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक एस.पी.आहेर, बजरंग कहाटे, प्रवीण कोकाटे, उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, गणेश माळी, रामदास योगिता, नितीन रौंदळ, कृष्णा नागरे, पी.डी.जाधव, दिलीप जाधव, प्रा. जयंत महाजन आदी प्रमुख त्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी उपस्थित होते. नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनचे संचालक असलेल्या दीपक भोसले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जास्तीत जास्त योगदान सर्व जॉगर्स व इतर असोसीएशनचे मिळून देण्यात येणार आहे. गोल्फ क्लब मैदानावरच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी दीपक भोसले यांचा सत्कार सायकल असोसिएशनचे अरुण पवार यांनी केला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नागरे यांनी केले. यावेळी सायकल असोसिएशनचे अध्यक्ष किशोर काळे, हेमंत गोसावी, जयवंतराव देशमुख, भरत गुरव, साहेबराव साळुंखे, जगदीश पोद्दार, दीपक काळे, संजय पवार, रवींद्र दुसाने, जगदीश गडकरी, अशोक सावंत, बजरंग कहाटे, प्रवीण कोकाटे प्रवीणकुमार पाटील, चंद्रकांत नाईक, गणेश माळी, रामदास योगिता, नितीन रौंदळ, शेखर निकुंभ, उदय कोठावदे, शाम साबळे यांच्यासह सर्व महिला सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन विनय बिरारी यांनी व्यक्त केले.
*मंत्री कोकाटे यांच्याकडून भोसलेंचे अभिनंदन*
दीपक भोसले यांना महाविद्यालयीन काळापासून आपण ओळखतो. खेळामध्ये रुची असलेल्या भोसले यांनी त्याच क्षेत्रात आपले करिअर केले आहे. त्यांचे कार्य तरुणांसाठी दीपस्तंभासारखे आहे. आजपर्यंत सायकलिंगच्या २५ स्पर्धेत भाग घेणारे भोसले यांनी ६३ मॅरेथॉन व पोहण्याच्या सोळा स्पर्धांमध्ये देशात व प्रदेशात भाग घेतला आहे. कजाकीस्थान, अमेरिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलियासह युरोपमध्ये देखील त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे योग्य अशा व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाला वैभवाचे दिवस येतील व या मैदानातील सर्व समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येतील. जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांच्या कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा!
*ॲड माणिकराव कोकाटे, मंत्री महाराष्ट्र राज्य