वावी येथे राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाने पशुपालकांसाठी उघडली प्रगतीची नवी दारे
3 ते 5 जानेवारी दरम्यान आयोजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

वावी येथे राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाने पशुपालकांसाठी उघडली प्रगतीची नवी दारे
3 ते 5 जानेवारी दरम्यान आयोजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. 30 डिसेंबर 2025, www.gurunews.co.in
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुपालन व्यवसायाला चालना देणारे आणि शेतकरी-पशुपालकांसाठी दिशादर्शक ठरणारे भव्य राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शन वावी (ता. सिन्नर) येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यासाठी सिन्नर उत्पन्न बाजार समितीने यात पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम 3 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नामवंत पशुपालक, आधुनिक संगोपन पद्धती आणि उत्कृष्ट देशी-परदेशी वंशाचे पशुपक्षी यामुळे हे प्रदर्शन सिन्नर तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरत आहे. या प्रदर्शनात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, कुत्रे तसेच विविध आकर्षक पक्ष्यांचे प्रदर्शन करण्यात आले असून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पशुपालनातील नवे तंत्रज्ञान, रोगप्रतिबंधक उपाययोजना, संतुलित आहार, लसीकरण आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती याबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रदर्शनात सहभागी झालेल्या पशुपालकांना आपल्या पशुधनाच्या गुणवत्तेची तुलना करण्याची, नव्या जातींबाबत माहिती मिळविण्याची तसेच थेट व्यवहाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उत्कृष्ट पशुपक्ष्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून यामुळे पशुपालकांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमामुळे पशुपालन व्यवसाय अधिक शास्त्रीय, फायदेशीर व टिकाऊ होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



