मराठी भाषेला साहित्याची समृद्ध परंपरा

मराठी भाषेला साहित्याची समृद्ध परंपरा मराठी आपली शान असून, आपला मान डॉ. वाघ
सिन्नर, गुरु न्यूज नेटवर्क | दि. 01 मार्च 2025
सिन्नर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमा निमित्ताने डॉ. संतोष वाघ यांनी मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची परंपरा असून, शके १११० मध्ये मुकुंदराजांनी लिहिलेल्या ‘विवेकसिंधू’ या ग्रंथापासून आजतागायत मराठी साहित्यालाही तितकीच समृद्ध परंपरा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. पवार अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवाजी सुंभे, प्रा. बी. यू. पवार, प्रा. व्ही. एम. हारक आदी उपस्थित होते.
प्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार पुढे म्हणाले की, मराठी भाषेला उज्ज्वल परंपरा असून, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला अधिक महत्वाचे स्थान व संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. संतोष वाघ यांनी कुसुमाग्रजांच्या कार्याचाही गौरव केला. डॉ. डी. बी. वेलजाळी यांनी प्रास्ताविक, डॉ. सी. ई. गुरुळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. डी. एन. शिंदे यांनी आभार मानले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी विभागातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते.