सोनांबे विद्यालयाचे माजी विद्यार्थी 29 वर्षांनी रमले शालेय आठवणीत

सोनांबे विद्यालयाचे माजी विद्यार्थी 29 वर्षांनी रमले शालेय आठवणीत
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर दि. 26 मे 2025
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय सोनांबे इयत्ता दहावी सन 1996 – 97 च्या विद्यार्थ्यांचा सहस्नेह मेळावा केशरबाग येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी” गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा” या सुवचनाप्रमाणे गुरूंच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करत गुरुच्या प्रति आदरांजली समर्पित केली. यावेळी मेळाव्यास उपस्थित माजी 90 विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून त्यांचा सध्याचा जीवनक्रम परिचय करून दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी ऋण न फिटणारे, ऋण न मिटणारे, ऋण नं तुटणारे या शब्दात गुरुने दिलेल्या शिदोरीचे, ज्ञानाचे आमच्या जीवनात सार्थक झाल्यामुळे आम्ही आज समाजात सुजाण नागरिक म्हणून विविध क्षेत्रात दमदारपणे वावरत आहोत. अशा भावना व्यक्त केल्या. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उपस्थिती गुरुजनांचे गुलाब पुष्प, शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेटवस्तू देऊन यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरील अध्यक्षस्थानी सर्वश्री मा. मुख्याध्यापक विष्णू सोनवणे, पुरुषोत्तम थोरात, किशोर जाधव, बाळासाहेब कलकत्ते, के. एस. नवले, साहित्यिक, व्याख्याते, इंग्रजीतज्ञ शिक्षक प्रभाकर चतुर, रेवगडे डी. बी. सर आदी गुरुजनांनी आपल्या भाषणातून माजी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ), मानवी मूल्य व मानवता, मैत्रीचे महत्त्व, संघटन, स्वा व्यक्तिमत्व विकास, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी मुल्यांवर विशेष जोर देऊन भावी भारताचे सुजान नागरिक म्हणून आपले हातून समाज, राष्ट्र, देवधर्माची सेवा सेवा घडावी व ज्यांनी आपल्याला घडविले त्या मात्यापित्यांची सेवा, शाळेबद्दल आदर, मातृसंस्थेबद्दल आदर ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते शंकर पवार, विजय जाधव, भाऊसाहेब पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव डावरे, सोपान शिंदे यांनी केले, तर आभार सुरेखा डावरे, मीना शिंदे, सुनिता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘जीवन की राहा पर, आगे बढते जायेंगे! चाहे कभी भी हो हम, पर आपको ना भुल पायेंगे ‘या काव्यपंक्तीत आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील शिंदे, रावसाहेब डावरे, शिवाजी डावरे, केशव पवार, शिवाजी पवार, सोपान पवार, रवींद्र बोडके, मच्छिंद्र शिंदे, शरद वाघसरे, मारुती खेताडे, रामेश्वर सदगीर, रामदास टेकनर आदींनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाची सांगता’ गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा ‘ या गीताने झाली.