सिन्नरच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या मनमानीचा कळस

सिन्नरच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या मनमानीचा कळस
गुरु न्यूज नेटवर्क, सिन्नर प्रतिनिधी : www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. माणिकरावजी कोकाटे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी यांच्यावर पकड व प्रभुत्व राहिले आहेत. मात्र सिन्नरचे प्रशासकीय अधिकारी मात्र याना तिळमात्र फरक पडलेला नाही.
मा. माणिकरावजी कोकाटे राज्याचे कृषिमंत्री असल्याने त्यांच्या कामाचा ठसा नेहमीच राहिला आहे. त्यांच्या कामाची गती ही नेहमी आक्रमक पद्धतीने गाजलेली आहे. मात्र सिन्नर तालुक्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचा भास कदाचित प्रशासकीय अधिकारी यांना झाला असावा. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील काही अधिकारी चित्रीमिरी घेवून काम करायचे असे बोलले जायचे परंतु तसे नसुन, त्यांचा भाव मात्र पेटी, खोके याशिवाय ते बोलत नाही.
शेतकऱ्यांचे शेती निगडीत छोटे-मोठे काम प्रशासनासी येत असते. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांचा भाव वाढत असून, त्यासाठी प्रत्येक अधिकारी यांचा स्वंतत्र कमिशन एजन्ट नेमलेला असतो. काही ठराविक अधिकारी सोडले तर बरेच अधिकारी पैशाशिवाय कामाची फाईल पुढे सरकत नाही. साधे रेशन कार्ड मधील काही बदल असो किंवा जमिनितील काही फेरफार असल्यास ते काम करताना किती फेऱ्या लागतील याचे मोजमाप नाही. आणि फेऱ्या मारूनही ते काम होईलच यांची शास्वती नाही. त्यासाठी कमिशन एजन्ट शिवाय पर्याय नाही.