सहकार ही महाराष्ट्राच्या विकासाची गुरुकिल्ली – सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते

सहकार ही महाराष्ट्राच्या विकासाची गुरुकिल्ली – सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर प्रतिनिधी ; www.gurunews.co.in
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष -2025 या निमित्ताने सिन्नर महाविद्यालयातील विध्यार्थी यांना सहकारात करियर करण्यासाठी खुप मोठी संधी असल्याचे मत सहकारी संस्था सिन्नर येथील सहाय्यक निबंधक मा. श्री. संजयजी गीते यांनी व्यक्त केले. सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे “वाणिज्य आणि नियोजन मंडळाचे उद्घाटन” वेळी ते बोलत होते.
श्री. गिते पुढे म्हणाले की, सहकारातून समृद्धी, सहकारातून ग्रामीण विकास कसा साधता येतो याबाबत मार्गदर्शन करत असताना, सहकारी क्षेत्रामध्ये असलेल्या नोकरीच्या विविध संधी याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांची चर्चा केली. आणि त्यांना सहकार क्षेत्रात करियर करण्यासाठी आम्ही आपणास मदत करू असे आश्वासन दिले.
तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक मा. श्री. महेश कुटे यांनी विद्यार्थ्यांची भविष्यकाळात सहकार कसे असेल आणि सहकारातून नवनवीन रोजगार आणि उद्योग संधी कशा निर्माण होतील, याविषयी मार्गदर्शन केले.
त्यानंतर श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था, सिन्नर या संस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी यांनी विविध उदाहरणे आणि आपल्या जीवनात घडलेले विविध प्रसंगाद्वारे विद्यार्थ्यांना सहकाराचे महत्व पटवून दिले. विध्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर विविध नोकरीं शोधत असतात. अपेक्षित नोकरीं न मिळाल्याने जीवनात नैराश्य येते. त्यातून मार्ग काडून व्यवसाय निवडावा किंवा सहकार क्षेत्रात मनापासून काम केल्यास जीवनाचे निश्चित सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही यांची आम्हाला खात्री असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विध्यार्थी यांच्यात गुणात्मक दर्जा, वाढविण्यासाठी समाज दिनाच्या दिवशी दोन विध्यार्थी यांना आकर्षक ट्रॉफी व गिफ्ट श्रीलेखा पतसंस्था यांच्या कडून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सुरुवातीला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि मान्यवरांना आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील सहकाराची सुरुवात आणि सहकाराची सद्यस्थिती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सहकारातील नवीन संधी याबाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, उपस्थित मान्यवरांशी सहकार विभागाशी MOU करण्याबाबतची आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनील कर्डक यांनी केले, प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. जी. आर. पाटील यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. एल. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. एस. पी. जाधव यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, संचित नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र घोलप, प्रा. आर. एन. सोनवणे, डॉ. पी. बी. गोळे, प्रा. श्रीमती के. एस. शेटे, प्रा. श्रीमती एस. आर. गायकवाड, प्रा. अंकिता कडलग, प्रा. सायली धोंडगे, प्रा. श्रीमती सोनाली कोकाटे, डॉ. मंगल सोनवणे, डॉ. योगेश वाळुंज आदि मान्यवर आणि वाणिज्य विद्याशाखेचे बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.