सिन्नर नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन

सिन्नर नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन
सिन्नर, गुरू न्यूज नेटवर्क : दि. १४ ऑगस्ट २०२५, www.gurunews.co.in
सिन्नर नगर परिषदेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले.
आपल्या घरावर आज व उद्या हर घर तिरंगा झळकावाऊन आपल्या देशावरील प्रेम दाखवावे. आपल्याला तिरंग्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेले असून, स्वातंत्र्य समानता असे झेंड्याचे विशेष गुण आहेत. सदर रॅलीचे उद्घाटन सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनी केले. नगरपालिकेपासून सुरुवात करून, पंचायत समिती मार्गे गंगावेस, गणेश पेठ, शिवाजी चौक, तानाजी चौक, फडकीवेस, सिन्नर बस स्टॅन्ड, शिवाजीनगर, भाटवाडी, खर्चे मळा, लक्ष्मीनारायण लॉन्स, महालक्ष्मी रोड, आणि गावातील संपूर्ण सर्वप्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कैलास चव्हाण, अमोल पवार, विजय जाधव, विजय वाजे, योगेश मुळे, निलेश चव्हाण, रवींद्र देशमुख, अविनाश पुंड, प्रशांत रायते सर्व विभागातील सर्वप्रमुख हजर होते.