सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी महिला यांच्या विविध स्पर्धा आज संपन्न

सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी महिला यांच्या विविध स्पर्धा आज संपन्न
गुरु न्यूज नेटवर्क | सिन्नर दि. २१ सप्टेंबर २०२५ www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नागरी सहकारी पतसंस्था यांच्यामधील पदाधिकारी व कर्मचारी यांनी आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ यानिमित्ताने विविध स्पर्धा मध्ये भाग घेऊन, आपल्या नेहमीच्या कार्यतत्परतेच्या कामातून वेळ काढून विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर व तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन सिन्नर आणि अविष्कार सहकार प्रशिक्षण व संशोधन सहकारी संस्था सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा. सहाय्यक निबंधक संजयजी गीते यांच्या मार्गदर्शाखाली कार्यालयातील मा. सुदर्शन तांदळे, मा. नवनाथ गडाख तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन मा. नारायणशेठ वाजे यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी हॉल, लाल चौक, सिन्नर येथे सदर कार्यक्रमाचे सर्व विजेत्या महिलांना सन्मान गिफ्ट व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस व सन्मानपत्र देण्यात आले.
या स्पर्धांमध्ये तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्था मधील महिला पदाधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. महिलांनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव करून दिली. आनंदीमय वातावरणात आणि जल्लोष करत सदर कार्यक्रम मोठा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अँकर) श्रीमती पूनम खुळे यांनी
केले व परीक्षक म्हणून श्रीमती. संगीता इघेवाड, सौ. सुरेखा संजय सोनवणे व सौ सविता राजेंद्र कमांकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेकरिता विशेष असे सहकार्य श्रीमंत थोरले बाजीराव सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक महेश कुटे व श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी यांनी या कार्यक्रमासाठी आपले योगदान व सहकार्य केले.
सिन्नर तालुक्यातील विविध सहकारी पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी आपली हजेरी व योगदान दिले त्या सन्माननीय महिला काजल प्रसन्न पाटील ( एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था), काजल अनिल बलक ( एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था), निलेश्वरी वैभव शहाणे (एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था), आकांक्षा
विकास भागवत ( एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था), साधना दिलीप भाबड ( एस एस के धनलक्ष्मी पतसंस्था), शोभा बाळू सातपुते (जिजामाता महिला पतसंस्था), लता रामराव पवार (प्रियदर्शनी महिला पतसंस्था), शोभा कर्नाटकी (प्रियदर्शनी महिला पतसंस्था), शिल्पा संतोष दातरंगे (प्रियदर्शनी महिला पतसंस्था), वैशाली कुलकर्णी (प्रियदर्शनी पतसंस्था), वैशाली संजय सानप (प्रियदर्शनी पतसंस्था), मलेका भैय्यासाहेब सय्यद (आझाद नागरी पतसंस्था), फरीदा रशीद शेख (आझाद नागरी पतसंस्था),
हेमलता अजित शिंदे ( पंडित दीनदयाळ पतसंस्था), रोहिणी सुनील चव्हाण ( पंडित दीनदयाळ पतसंस्था), मंगला केशव आडके (यश नागरी सहकारी पतसंस्था), ललिता कोतवाल (सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था), दिपाली सागर डावरे ( श्री देवनदी खोरे ग्रामीण पतसंस्था), प्रतिभा सागर कडभाने ( जगदंबा माता पतसंस्था), वनिता सुभाष खाडे ( जगदंबा माता पतसंस्था ), शैलजा संजय यादव (सिन्नर तालुका सेक्रेटरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी),
नीता नितीन कुलकर्णी (विघ्नहर्ता पतसंस्था ), इंदुताई सुखदेव कोकाटे (सिन्नर महिला पतसंस्था), वंदना सुरेश बर्वे (श्रीमंत पेशवे पतसंस्था), योगिता प्रदीप वारुंगसे (व्हिजन महिला विकास पतसंस्था), अंजली महेश कुटे (व्हिजन महिला विकास पतसंस्था ), सुवर्णा अशोक रंधे (व्हिजन महिला विकास पतसंस्था), कु. सानिका कांताराम माळी (व्हिजन महिला विकास पतसंस्था), शितल संकेत माळी (श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था), कु. आदिती रवींद्र खुळे (व्हिजन महिला विकास पतसंस्था), शोभा माणिक वाजे (व्हिजन महिला पतसंस्था), अर्चना प्रकाश डावरे
(कोनांबे महिला पतसंस्था ), संगीता बाळू इघेवाड ( प्रियदर्शनी महिला पतसंस्था), सुरेखा संजय सोनवणे (संत सेना पतसंस्था ), सविता राजेंद्र कमांकर (सह्याद्री मेडिकल संचालिका), तृप्ती नितीन खरनार (व्हिजन महिला विकास पतसंस्था ), कीर्ती अमोल वाजे (श्रीमंत पेशवे पतसंस्था), भारती संपत वारुंगसे (श्रीमंत थोरले पतसंस्था ), सुनिता रुपेश वालझाडे (जय हरी ग्रामीण पतसंस्था), सुनीता अनिल ठोंबरे (जिजामाता महिला पतसंस्था), रागिनी ज्ञानेश्वर आंधळे (सिद्धेश्वर नागरी पतसंस्था), प्रियंका सागर जोशी (व्हिजन महिला विकास पतसंस्था ), आदी पतसंस्था मधील पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात येऊन सुरुची भोजन घेऊन कार्यक्रम समाप्ती करण्यात आली.