महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उद्धारासाठी व्हिजन संस्थेची स्थापना म्हणजे मैलाचा दगड ठरेल – राजश्री गीते

महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उद्धारासाठी व्हिजन संस्थेची स्थापना म्हणजे मैलाचा दगड ठरेल – राजश्री गीते
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. ०५ सप्टेंबर २०२५
सिन्नर मध्ये व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन करत असताना मला मनस्वी खूप आनंद होत असून, महिलांच्या सामाजिक तसेच आर्थिक उद्धारासाठी व्हिजन संस्थेची स्थापना म्हणजे मैलाचा दगड ठरेल असे गौरवोद्गार उद्घाटन प्रसंगी मा. सौ. राजश्रीताई संजय गीते (कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर) यांनी काढले.
राजश्रीताई गीते पुढे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण काळाची गरज असून, बऱ्याच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले असून, यावेळी सर्व संचालक महिलांना त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले. आपले विचार व्यक्त करत असताना ही संस्था निश्चित नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन श्री. नारायणशेठ वाजे यांचे संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या व्हिजन महिला विकास नागरी सहकारी पतसंस्थेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा दि.०५ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. यावेळी नारायणशेठ वाजे म्हणाले की, श्रीमंत संस्थेची वेगळी शाखा सुरू करावी
अशी येथील नागरिकांची मागणी होती. परंतु महिलांना स्वतंत्र स्थान देऊन त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये मोलाचे योगदान करावे. हा या मागचा मूळ हेतू असून, महिलांचे स्वतंत्र आर्थिक व्यासपीठ असावे यासाठी या संस्थेची स्थापना केली असून, पेशवे पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी या संस्थेच्या प्रगतीत नेहमीच मदत करतील याची
ग्वाही दिली. होईल तितके सहकार्य करण्याची आमची तयारी असून, त्यांना आगामी काळात आपल्या स्वतःचा कर्तुत्वाचा ठसा आणि आपलं योगदान या संस्थेच्या माध्यमातून त्या देऊ शकतील हा हेतू मनात ठेवून या संस्थेची खऱ्या अर्थाने ही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेतील सर्व संचालिका उच्चशिक्षित आहेत. त्यांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामाध्यमातून सर्व सामान्य महिलांना आर्थिक गरज पूर्ण करून त्यातून रोजगार निर्माण करण्यासाठी सहकाराची जोड असणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजयजी गीते (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सिन्नर), आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की, सिन्नर तालुक्यातील माझ्या काळातील पहिली महिला पतसंस्था प्रमाणपत्र देताना, महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन संस्थेची निर्मिती बाबत प्रस्ताव आल्यानंतर महिलांनी त्यांचा उद्देश आणि कार्याबद्दल सर्व संकल्पना मांडली. त्यांचा हेतू आणि महिलांनी महिला सक्षमीकरण व महिला विकास करण्यासाठी सहकाराची जोड असल्याशिवाय शक्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. आणि मी ही त्यांना या कार्यासाठी सर्वतोपरी मदत करून, संस्था बळकट करण्यासाठी सर्वच संस्थाना नेहमी मार्गदर्शन करत असतो आणि राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शीतलताई सांगळे, आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणल्या की, या संस्थेतील सर्व संचालिका उच्च शिक्षित असल्याने त्यांचे कार्य निश्चित उत्कृष्ट व प्रभावशाली राहील यात शंका नाही. या महिला संस्थेस मी मनपूर्वक शुभेच्छा देत असून, संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत राहो ही सदिच्छा!
सिन्नर महिला पतसंस्थेच्या चेअरमन मा. सौ. तेजश्रीताई हेमंतराव वाजे, श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. अरुणशेठ वारुंगसे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हिजन संस्थेच्या चेअरमन सौ. जयश्री वारुंगसे यांनी केले तर सूत्रसंचलन सौ. वैशाली वाजे , संचालक परिचय सौ. अंजली कुटे, तर आभार प्रदर्शन सौ. किर्ती वाजे यांनी केले. सौ. शितल माळी व श्रीमती. शोभा वाजे यांनी संचालकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर उद्घाटक सौ. राजश्रीताई गीते, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नारायणशेठ वाजे, प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक श्री. संजयजी गीते, सिन्नर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. तेजश्री वाजे, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शीतलताई सांगळे, श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्री. अरुणशेठ वारुंगसे, कॅन्टोन्मेंट बोर्ड , देवळालीचे माजी उपाध्यक्ष श्री. बाबूराव मोजाड, माजी नगरसेवक सौ. ज्योती वामने, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मेधा पावसे या उपस्थित होत्या. तर शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यामध्ये मा. प्रकाशभाऊ वाजे, डॉ. विजय लोहरकर, सौ. सुजाता लोहारकर, डॉ. पठारे, श्री. निमिष लाले, श्री. मधुकर खरात, श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे संचालक श्री. काशिनाथ वाजे, श्री. शंकर वामने, श्री. दामू कुंदे, आनंदा सहाणे, श्री. गणेश वाजे, श्री. म्हसू पवार, श्री. प्रदीप वारूंगसे, सगर विद्या प्रसारक संस्थेच्या संचालिका सौ. मंगलाताई झगडे, तालुका फेडरेशन चे संचालक श्री. इलाहीबक्ष शेख, सचिव श्री. राजेंद्र घोलप यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या चेअरमन सौ. जयश्री वारुंगसे, व्हा. चेअरमन सौ. वैशाली वाजे, जनसंपर्क संचालिका सौ. अर्चना थेटे, संचालिका सौ. अंजली कुटे, सौ. सोनाली ढोली, श्रीमती अश्विनी वारुंगसे, सौ. तृप्ती खरणार, सौ. शितल माळी, सौ. किर्ती वाजे, श्रीमती शोभा वाजे, सौ. प्रियंका जोशी, स्वीकृत संचालिका सौ. शैला एखंडे, सौ. सुवर्णा रंधे, व्यवस्थापिका कु. सानिका माळी, सहा. व्यवस्थापक श्री. संदीप रंधे, लिपिक कु. अदिती खुळे तर श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे कार्यकारी संचालक श्री. महेश कुटे, श्रीलेखा पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. कांताराम माळी, श्री. अय्युब शेख, श्री. अंबादास थेटे तसेच पेशवे पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.