सिन्नर लायन्स क्लब व सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे १७५ वयवंदना कार्डचे वाटप

सिन्नर लायन्स क्लब व सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे १७५ वयवंदना कार्डचे वाटप
गुरू न्यूज नेटवर्क | सिन्नर, दि. १५ सप्टेंबर २०२५. www.gurunews.co.in
सिन्नर मध्ये लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या वतीने लायन्स हॉल, रामनगरी येथे आयोजित शिबिरात १७५ जेष्ठ नागरिकांना आयुष्यमान वयवंदना कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.
वय वर्षे ७० च्या पुढील व्यक्तीना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या कार्डद्वारे महाराष्ट्रात १३५६ आजारांवर व महाराष्ट्राबाहेर १९६१ आजारांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका व्यक्तीसाठी पाच लाख रुपयांपर्यंतच्या आजारांवर मोफत उपचार करता येऊ शकतात. यात खुबा प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवर देखील मोफत उपचार केले जातात. सदरील कार्ड हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार घेऊ शकतात.
वय वर्षे ७० किंवा त्या पुढील सर्व वयस्कर व्यक्तींसाठी वयवंदना कार्ड आयुष्मान भारत योजनेच्या मिशनमधून साकार करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी पीएमएजेवाय व एमजेपीजेएवायचे नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मोरे यांचे मार्गदर्शन व जिल्हाप्रमुख डॉ. राहुल सोनवणे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीप पगार यांच्या सहकार्यातून आरोग्य मित्र एकनाथ तिरमाळी, राकेश अपसुंदे, आकाश आहेर, कल्पेश धिवरे, निखिल पाटील, महेंद्र तांबे, भीमराव भालेराव यांनी सर्व वयवंदना कार्ड काढण्यात विशेष मदत केली.
सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप गुरुळे व डॉ. भूषण वाघ आणि कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. उपक्रम यशस्वितेसाठी लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. हेमंतनाना वाजे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. बबन वाजे, सचिव श्री. जयवंत काळे, खजिनदार श्री. प्रशांत शिंदे, माजी झोन चेअरपर्सन अपर्णा क्षत्रिय, संगीता वाजे, तृप्ती काळे, डॉ. भरत गारे, डॉ. विष्णू अत्रे, श्री. संजय सानप, श्री. मनीष गुजराथी, श्री. सोपान परदेशी, डॉ. विजय लोहारकर, प्रा. गणेश पाटील आणि प्रकल्पप्रमुख डॉ. प्रशांत गाढे यांनी विशेष परिश्रम घेतले.