नाशिक जिल्हाअध्यक्षपदी कुटे, तर सिन्नर तालुकाअध्यक्षपदी माळी यांची निवड
मानद सहकार मंच समृद्धी फांऊडेशनचा उद्घाटन सोहळा संपन्न

मानद सहकार मंच समृद्धी फांऊडेशनचा उद्घाटन सोहळा संपन्न
नाशिक जिल्हा अध्यक्षपदी कुटे, तर सिन्नर तालुका अध्यक्षपदी माळी यांची निवड
गुरू न्यूज नेटवर्क | नाशिक, दि. २८ ऑगस्ट २०२५
संपूर्ण भारत कार्यक्षेत्र असलेल्या मानद सहकार मंच समृद्धी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य लेखापरिक्षण (से.नि) मा. श्री. तानाजी कवडे, आणि मानद सहकार मंच समृद्धी फाऊंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. मधुकर बोडके, यांच्या संकल्पनेतून या मंचचे आयोजन करण्यात आले.
.
या मंचच्या माध्यमातून संपूर्ण देशातील सहकारी संस्था यांच्या समस्या व अडीअडचनी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मा. बोडके यांनी दिले. आठवड्यातून किमान दोन वेळेस एक तासाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच देश भरात जिल्हा स्तरावर जिल्हा अध्यक्ष तर तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष नेमणूक करण्यात आली असून, काही ठिकाणी नेमणूक करण्याचे काम सुरू आहे. यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्षपदी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था मर्यादित या संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. महेश कुटे तर तालुका अध्यक्षपदी श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था व्यवस्थापक कांताराम माळी यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी संचित पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र घोलप उपस्थित होते. सदर मंचचा विस्तार करण्यासाठी सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन श्री. मधुकर बोडके यांनी केले.
मा. श्री. मधुकर गायकर ( संस्थापक यशोमंदिर सह. पत. मर्या. मुंबई), मा. श्री. दिलीपजी घुगे समाजसेवक (हिंगोली), मा. श्री. रमेश लव्हांडे (अध्यक्ष दि. महाराष्ट्र मंत्रालय शासकीय कर्मचारी पतसंस्था), सहसंस्थापक व डायरेक्टर सौ. नलिनी बोडके, अॅड श्री. संतोष गाडे (डायरेक्टर), अॅड. श्री. भोजजी बनसोडे (डायरेक्टर), मा. श्री. रूपेश बावनकर (डायरेक्टर) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकमाची सुरवात मंदार पांचाळ प्रस्तुत अंभगवाणीने झाली. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन करण्यात आले कार्यकमाचे अध्यक्षस्थान संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मधुकर बोडके यांनी स्विकारले. मान्यवरांचा सत्कार करून फाऊंडेशनचे उद्घाटन व वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. संस्थेची घटना, व्हिजन व मिशन चे वाचन करण्यात आले. विविध जिल्हांयांचे जिल्हाध्यक्ष यांचे नेमणुकीचे पत्र देण्यात आले, विविध तालुका व शहरांच्या अध्यक्षांच्या नेमणुकीचे पत्र देण्यात आले. मा. श्री. दिलीप गायकर, मा. श्री. संभाजी सुर्यवंशी, मा. श्री. साकुरदास चोपडे, मा. श्री. आबासाहेब देशमुख, मा. श्री दिलीपराव घुगे, मा. श्री. संतोष सुतार यांनी फाऊंडेशनला शुभेच्छा दिल्या उपस्थित सभासदांसाठी मा. तानाजी कवडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. फांऊडेशनचे राष्ट्रीय संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. मधुकर बोडके यांनी संस्थेची ध्येय व अभियान डीजी सहकार प्रशिक्षण अभियान, सहकार फॉर युथ अभियान, महिला सक्षमीकरण अभियान, माझी वसुंधरा अभियान, बिया दान अभियाना बाबत माहिती दिली. उपस्थितांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगिताने कार्यकमाची सांगता झाली. कार्यकमाचे सुत्रसंचालन सौ. स्वाती ढमाले (अक्कासाहेब होम मिनीस्टर फेम) यांनी सुमधुर वाणीने कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात केले. सभासद नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी www.sahakarmanchfoundation.in वेबसाईटला भेट दया असे आहवान केले.