पतसंस्था चालवताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी फेडरेशनच्याच माध्यमातून सोडवता येतात : नारायणशेठ वाजे
संस्था चालविताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा : संग्राम कातकडे

पतसंस्था चालवताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी फेडरेशनच्याच माध्यमातून सोडवता येतात : नारायणशेठ वाजे
संस्था चालविताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा : संग्राम कातकडे
गुरू न्यूज नेटवर्क : सिन्नर, ता. २९ ऑक्टोंबर 2025, www.gurunews.ci.in
पतसंस्था चालवताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी फेडरेशनच्याच माध्यमातून सोडवता येतात, सहकार विभागाने अंशदान योजनेसंदर्भात लागू केलेला मसुदा हा राज्य फेडरेशनला न विचारताच लागू केला आहे. कारण या मसुद्यात केवळ अ आणि ब वर्गातील पतसंस्थांच्याच ठेवींवर संरक्षण लागु होते. क आणि ड वर्गातील संस्थांवर अन्याय होतो. त्याला फेडरेशनच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा परवाना रद्द होऊ नये, त्यासाठी अनेक पतसंस्थांनी ज्या ठेवी दिल्या त्याची व्याज येथे दीड महिन्यात मिळेल. अशी ग्वाही राज्य फेडरेशन पतसंस्थेचे उपकार्याध्यक्ष तथा श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे यांनी केले. सिन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या २२ व्या आदीमंडळाची वार्षिक सभेप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिन्नर सहाय्यक निबंध माननीय संजय गीते साहेब हे कोर्टाच्या कामानिमित्त नाशिक येथे असल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी सदर कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सभेचे अध्यक्ष स्थानी सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संग्राम कातकाडे होते. कातकडे पुढे म्हणाले की, सहकार सक्षम बनण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येक संस्थेने आपापल्या संस्थेत विश्वासार्था व सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे एखादी बाजारपेठ निर्माण होत असते. त्या ठिकाणी एकाच प्रकारचे अनेक दुकाने असतात. त्याच प्रकारे सिन्नर शहरात व तालुक्यात अनेक सहकाराचे जाळे निर्माण झाल्यास सहकारावरील विश्वास निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही मी देऊ शकतो. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन संग्राम कातकाडे यांनी कुठलीही संस्था आर्थिक पाठबळाशिवाय पुढे जात नसल्याचे सांगत तालुक्यात ६८ संस्था असून या छोट्या मोठ्या संस्थेच्या अनेक गुंतवणुका जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू वसुली अधिकारी मार्फत फेडरेशनचे उत्पन्न वाढवण्याचे ही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेडरेशनच्या कार्यालयासाठी जागा म्हणून देण्याच्या आश्वासन खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिले असून नगरपालिकेच्या माध्यमातून ओपन स्पेस उपलब्ध झाल्यास तेथे आपले कार्यालय करण्यात येणार आहे. फेडरेशनच्या वतीने निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्याचा मानसही असल्याचे ते बोलले.

सहकाराला बळकटी व चालना देण्याकरिता सिन्नर तालुका फेडरेशनचे तालुका अध्यक्ष सन्माननीय संग्राम कातकडे हे अभ्यासू नेतृत्व असून, त्यांचे ध्येय धोरण हे उत्तम प्रकारचे आहे. त्यांना फेडरेशनच्या माध्यमातून सलग पाच वर्ष संधी देऊन, तालुक्यातील संस्था व फेडरेशन निश्चितपणे प्रगतीपथावर राहून विश्वासपात्रता व संस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कार्यक्षम बनेल, यात कोणतेही प्रकारची शंका नसल्याचे विविध भाषणातून सर्वांनी नमूद केले. त्यामुळे संग्राम कातकडे यांच्या कामाची पद्धत ही निश्चित फेडरेशनला पुढे घेऊन जाईल, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे त्यांना यापुढील कार्यक्षम फेडरेशन तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची तालुक्यात निश्चित मान उंचावेल असे ते काम करतील अशी सर्वांना अपेक्षा आहेत.

तर व्यासपीठावर उपाध्यक्ष अरुण वारूंगसे, कार्याध्यक्ष राजेंद्र अंकार, सहकार अधिकारी सुदर्शन तांदळे, नवनाथ गडाख, संचालिका तेजश्री वाजे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सभेच्या प्रारंभी संस्थेची निगडित असलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या सचिव छाया घोलप यांनी सभेपुढे असलेल्या विषयांचे वाचन केले. यावेळी संस्थेच्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. २०२४/२५ च्या वार्षिक अहवाल ताळेबंद व आर्थिक पत्रकाची वाचून नोंद घेण्यात आली. २०२४/२५ या वर्षाच्या नफा तोटा पत्रकाची वाचून नोंद घेण्यात आली. सन २०२५/२६ या सालाकरिता तयार केलेल्या उत्पन्न व खर्चाच्या अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासकीय हिशोब तपासणी अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल वाचून नोंद घेण्यात आली. सन २०२५/२६ या वर्षाच्या लेखापरीक्षण करण्याकामी पॅनल वरील लेखापरीक्षक म्हणून सोमनाथ काठे यांची नेमणूक करण्यात आली. वार्षिक सभेला अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करण्यात आली.

यावेळी श्रीमंत पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी महेश कुटे, कस्तुरी पतसंस्थेचे व्यवस्थापक निमिष लाले, विघ्नहर्ता पतसंस्थेचे चेअरमन डॉ .विष्णू अत्रे, देवनदी पतसंस्थेचे संचालक बी.एम. पवार, सिद्धेश्वर पतसंस्थेच्या व्यवस्थापिका कोतवाल मॅडम, फेडरेशनचे संचालक मच्छिंद्र चिने, भाऊसाहेब पवार यांच्यासह सहकार अधिकारी नवनाथ गडाख यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी सहकार अधिकारी सुदर्शन तांदळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या पतसंस्थांच्या ठेवी अडकलेल्या आहेत त्याबाबत आपण सहाय्यक निबंधक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घोलप यांनी केले. तर आभार फेडरेशनचे उपाध्यक्ष अरुणशेठ वारुंगसे यांनी मानले. यावेळी फेडरेशनचे संचालक बाळासाहेब आव्हाड, अनिल पवार, कांताराम माळी, कैलास पवार, इलाहीबक्ष शेख, संचालिका सुमन बोडके आदींसह मधुकर कोकाटे, अविनाश कांडेकर, राजेंद्र जगझाप, बाळासाहेब पवार, संजय पवार, संदीप घोडे, मच्छिंद्र पवार, आदींसह अनेक पतसंस्थांचे चेअरमन व व्यवस्थापक, सभासद उपस्थित होते
तसेच हॉटेल संस्कृती येथे झालेल्या कार्यक्रमाचा सर्व खर्च व भोजनाचा खर्च सिन्नर तालुका फेडरेशन अध्यक्ष संग्राम कातकडे व फेडरेशनचे उपाध्यक्ष अरुणशेठ वारुंगसे यांनी स्वतः केला आहे.
सिन्नर तालुका फेडरेशन सक्षम करण्याकरिता नाशिक जिल्ह्याचे खासदार मा. राजाभाऊ वाजे यांनी लोकनेते नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेतून फेडरेशन सक्षमीकरण करण्यासाठी 105000/-( एक लाख पाच हजार रुपये) व एस. एस. के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांनी 175000/- ( एक लाख पंच्यातर हजार रुपये ) आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी पतसंस्था यांनी 150000/- ( दीड लाख रुपये) देणगी देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे यापुढील काळात वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी होणाऱ्या सभेचा खर्च ते स्वतः करणार असल्याचे त्यांनीही जाहीर केल्याने यापुढे फेडरेशन वर कोणत्याही प्रकारचा खर्च, (बोजा) पडणार नाही. त्यामुळे सिन्नर तालुका फेडरेशन हे सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास तालुक्यातील सहकारातील पदाधिकारी यांना आज मिळाला आहे.



