एल आय सी च्या सर्व एजंट, ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर

एल आय सी च्या सर्व एजंट, ग्राहक व कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
सोमवार, दि. १८ सप्टेंबर २०२३
www.gurunews.co.in
केंद्रीय वित्त मंत्रालयाने आज भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एल.आय.सी ) एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी दिली. एल.आय.सी (एजंट) नियमन, २०१७ मधील सुधारणा, ग्रॅच्युइटी (उपदान / विशिष्ट वर्षांनंतर सेवेतून मुक्त झाल्यानंतर, किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला मिळणारी रक्कम मर्यादित वाढ आणि कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा समान दर यांच्याशी संबंधित या कल्याणकारी उपाययोजना मंजुरी देण्यात आली आहे.
एल.आय.सी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी 30 टक्के या समान दराने कौटुंबिक निवृत्ती वेतन एल.आय.सी. च्या विकासात आणि देशात विमा विस्तार अधिकाधिक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या १३ लाखांहून अधिक एजंटना आणि १ लाखांहून अधिक नियमित कर्मचाऱ्यांना या कल्याणकारी उपाययोजनांचा लाभ होईल.
तसेच एल.आय.सी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असून, एल.आय.सी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे एल.आय.सी एजंट्सच्या कामकाजाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल त्याचा लाभ त्यांना होईल.
पुन्हा नियुक्त केलेल्या एजंटना मिळणारे कमिशन त्यांना ते यापुढे मिळणार असून, ते पात्र होण्यासाठी सक्षम करून त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य दिले आहेत. सध्या, एल.आय.सी एजंट जुन्या एजन्सी अंतर्गत पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यवसायावर पुन्हा कमिशनसाठी पात्र ठरत नव्हते. एल.आय.सी एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स, मुदत विमा कवच वाढवण्यात आले आहे. तीन हजार रुपयांवरून दहा हजार रुपये तर पंचवीस हजार रुपयांवरून १ लाख ५० हजार रुपये करण्यात आले आहे. यामुळे निधन झालेल्या एजंटांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ देण्यात येणार असून, भरीव कल्याणकारी लाभ मिळेल.