प. पु. लोकनाथतिर्थ स्वामी महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी सोहळा नर्मदापुरम् येथे संपन्न!

प. पु. लोकनाथतिर्थ स्वामी महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी सोहळा नर्मदापुरम् येथे संपन्न!
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
प. पु. लोकनाथतिर्थ स्वामी महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी कार्यक्रम सोहळा “नर्मदापुरम्” मध्यप्रदेश येथे मोठ्या थाटात संपन्न झाला असून, त्यासाठी ह.भ. प. बाळासाहेब देशपांडे यांनी परिश्रम घेतले.
ह.भ. प. बाळासाहेब देशपांडे, यांनी आयोजन करून, व ह.भ. प. विलास भगत यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच ह.भ.प. श्रीरंग कवडकर यांनी किर्तन, प्रवचन, व हरिपाठ कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले. नाशिक आणि सिन्नर मधील शंभर हून अधिक भाविक यांना या कार्यक्रमासाठी बरोबर घेऊन या अविस्मरणीय दर्शन घडून आणले. यामध्ये देशपांडे यांच्या कुटुंबीयांनी नर्मदापुर, मध्यप्रदेश येथे नर्मदानदीवरील सेठानी घाट येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन संतोष लांडगे, आणि ऋतुराज देशपांडे यांनी अतिशय सुंदरपणे पार पाडले.
प. पु. लोकनाथतिर्थ स्वामी महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी सोहळ्यासाठी सिन्नर येथून भाविकांनी दि. २४ फेब्रुवारी २०२४ ला प्रस्तान केले असता ओंकारेश्वर, नर्मदापूरम व उज्जैन असा ५ दिवसांचा प्रवास पूर्ण केला. नर्मदापुरम येथील सेठानी घाटावर स्नान करून जवळील श्री. स्वामी महाराज आश्रमात प्रसन्न आणि मनमोहक वातावरणात तीन दिवस विविध कार्यक्रमांनी जसे की प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, सामूहिक गितापठण, अभंगवाणी, नर्मदा महाआरती, पालखी मिरवणूक इत्यादी. कार्यक्रमांनी प. पु. स्वामी महाराजांची 69 वी पुण्यतिथि मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2024 ला संपन्न झाली. या दरम्यान सर्व परिसर भक्तिमय झाला होता. भाविकांची राहण्याची, जेवणाची अतिशय उत्तम सोय बाळासाहेब देशपांडे व
कुटुंबीयांनी केलेली होती. त्यानंतर दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी श्री. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथे सर्वांनी श्री. महाकाल दर्शन घेऊन सिन्नर ला रवाना झाले. अतिशय सुंदर अशा भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला व त्यासाठी
देशपांडे कुटुंबीयांनी अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल त्यांचे सर्व भाविकांकडून मनापासून खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व भाविकांचे व सिन्नर येथील भजनी मंडळाने उत्तम साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!