अक्षय पवार यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण

अक्षय पवार यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण
सिन्नर तालुक्यातील आणखी एक अधिकारी आयएएस
गुरु न्यूज नेटवर्क | दि. 22 एप्रिल 2025 www.gurunews.co.in
सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील अक्षय विलास पवार यांनी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबासह गावातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
अक्षय पवार यांनी सिन्नर मधील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातून शिक्षण घेतले, त्याच बरोबर गेल्या दोन वर्षांपूर्वी गुप्तचर विभाग दिल्ली येथील परीक्षा देऊन नोकरी करत आहे. नोकरी करत असताना यु पी एस सी ची परीक्षा देऊन आज दि. 22 एप्रिल 2025 रोजी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आय ए एस, आय एफ एस, आय पी एस या पदासाठी शासनाकडून परीक्षा घेण्यात आली होती. १००९ पदासाठी सदर परीक्षा घेण्यात आली.
यू पी एस सी परीक्षेत महाराष्ट्रातील 87 मुलांनी परीक्षेत यश प्राप्त केले. त्यात 21 मुलींचा समावेश आहे. भारतातून जनरल जागा 335, EWS- 109, OBC- 318, SC- 160, ST- 87 एकूण 1009 विद्यार्थी यांनी यश प्राप्त केले. त्यात आय ए एस अधिकारी 180, आय एफ एस अधिकारी 55, आय पी एस अधिकारी 147 असे एकूण 605 अधिकारी तर 142 अधिकारी हे ग्रुप बी मधून शासकीय सेवेत काम करतील.
अक्षय पवार हे कांताराम माळी यांचे भाचे आहेत. अक्षय पवार यांनी सिन्नर मधून शिक्षण घेत नाशिक नंतर दिल्ली येथे राहून नोकरी करत असताना, यु पी एस सी चा अभ्यास करत परीक्षा उत्तीर्ण होणे ही अभिमानाची गोष्ट मांनली जाते. नोकरी व तसेच शिक्षण घेत असताना, नेहमी सातत्य राखले व त्याचबरोबर जिद्द कायम मनात ठेवत मी आय ए एस अधिकारी होणार हे मात्र नेहमी आत्मविश्वासाने कुटुंबाला सांगत असे. हा असलेला आत्मविश्वास व अभ्यासातील सातत्य नेहमी राखत आज यश प्राप्त केल्यानंतर कुटुंबाचा आनंदाला पारा उरला नाही. अशा या जिद्दी व कौशल्यपूर्ण Specs पवार यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.