तरुणाईला व्यसना पासून दूर ठेवत क्रीडा क्षेत्राकडे घेऊन जाणारे ‘नेशन फर्स्ट फाऊंडेशन’

तरुणाईला व्यसना पासून दूर ठेवत क्रीडा क्षेत्राकडे घेऊन जाणारे ‘नेशन फर्स्ट फाऊंडेशन’
सिन्नर | गुरू न्यूज नेटवर्क :
आजही देशाची ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असून, एकूण युवकापैकी (युथ) ६५ – ७० टक्के तरुणाई ग्रामीण भागात स्थिरावलेली आहे. त्यामुळे देशाच्या भविष्यातील विकास योजनांची अमलबजावणी ग्रामीण भागातील युवकांना उपेक्षित ठेवून, कदापीही शक्य होणार नाही. भारत २०३५ सालापर्यंत तरुणांचा देश म्हणूनच गौरवला जाईल. ग्रामीण भागातील तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्याच काम डॉ. आनंद नागरे आपल्या “नेशन फर्स्ट फाउंडेशनच्या” माध्यमातून करताहेत.
मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया नावाच्या अदृश्य शक्तींनी संपूर्ण तरुणाई व्यसनाधीन करून टाकलीय, यामध्ये १८- २२ वर्ष वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. मोबाईलच्या माध्यमातून दररोज एक ते दोन जीबी (GB ) डाटा ह्या तरुणाईला ‘बरोजगार ‘आणि ‘ अकार्यक्षम’ करत असल्याची जराशी ही जाणीव होऊ देत नाही, हेच आमचं दुर्दैव आहे.
आजारांना आता कुठलीही वयाची मर्यादा राहिलेली नाही. अगदी तरुण मुलांना डायबिटीस, बी पी, हृदय रोगा सारख्या आजारानी ग्रासले आहे. परिणामी सरकारी योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा, समाजासाठी आपल्या परीनं योगदान म्हणून ग्रामीण भागात क्रीडासंस्कृती वाढावी यासाठी त्यांनी सिन्नर तालुक्यात गावोगावी हॉलीबॉल, हँडबॉल ची मैदाने तयार करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी ते स्वखर्चातून नेट, हॉलिबॉल, हँडबॉल आणि इतरही क्रीडा साहित्य पुरवित असून, सुरवातीस पाटपिंपरी, निमगाव, हिवरगाव, सोनारी, चापडगाव, धुळवड अश्या १० गावांचा त्यात समावेश झाला आहे. प्रत्येक महिन्याला १० – १५ गावं याप्रमाणे पुढील ५-६ महिन्यांमध्ये संपूर्ण तालुक्यात ही क्रीडा चळवळ उभी रहावी असा त्यांचा मानस आहे.
शिक्षण आणि आरोग्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युवकांमध्ये शारीरिक समृध्दी शिवाय आर्थिक व सामाजिक स्थैर्य विकसित होणार नाही याची ते जाणीव करून देतात. “जितने जादा खेल मैदान.. उतने कम अस्पताल “ह्या तत्वावर सुरू झालेल्या “नेशन फर्स्ट फाउंडेशनच्या” माध्यमातून युवकानंमध्ये खेळा विषयी आवड निर्माण करण, त्यांना व्यसनापासून दूर ठेवणं, सुदृढ आणि समृद्ध तरुणाई तयार करणं हाच खरा उद्देश असल्याचं मत त्यांनी मांडले.. वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायिकांच काम नुसतं आजार बर करणं नसून, समाजाला आजारां (व्याधी) पासून दूर ठेवणं देखील आहे. त्यासाठी preventive health care system तयार करावी लागेल. ह्याचाच एक भाग ही क्रीडा चळवळ लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्याचं काम करत आहे.
आरोग्य सुविधा कितीही उभारल्या तरी त्या वाढत्या लोकसंख्या पुढे कमीच पडतील त्यामुळे जोपर्यंत आपण preventive health care system (प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्था) तयार करत नाही, आणि त्याची अंमबजावणी शेवटच्या स्थरा पर्यंत पोहचत नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्था समृध्द होणार नाही. ग्रामीण भागात तरुणाईसाठी खेळाची मैदाने, व्यायामाची साधन, योगाभ्यास केंद्र उपलब्ध करून त्यांना तिला दैनंदिनीचा भाग बनवावा लागेल, परिणामी येत्या काळात अशी क्रिडा चळवळ देशातील संपूर्ण ग्रामीण भागात उभी राहील ह्या तरुणाईला तारण्यासाठी !